राहुरी कृषी विद्यापीठात बारा क्विटंल कांदा बियाणे

दहा जिल्ह्यांचा विस्तार पाहता मागणी एवढे बियाणे विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांना खंत आहे.
राहुरी कृषी विद्यापीठात बारा क्विटंल कांदा बियाणे
Onion SeedsAgrowon

नगरः महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कांदा बियाणे संशोधनात फारशी प्रगती नसली तरी उपलब्ध असलेल्या दोन वाणांच्या बियाण्यांची शेतकरी मागणी करतात. यंदा विद्यापीठाकडे १२ क्विंटल ७६९ किलो बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र गेल्या वर्षीपासून कांद्याचे क्षेत्र वाढत असल्याने यंदा सर्व शेतकऱ्यांना बियाणे मिळेल का? याकडे लक्ष लागले आहे. दहा जिल्ह्यांचा विस्तार पाहता मागणी एवढे बियाणे विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांना खंत आहे.

Onion Seeds
सरकारच्या हस्तक्षेपामुळेच कांद्याचा वांदा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे ‘फुले समर्थ’ व ‘बसवंत ७८०’ या दोनच वाणांचे बियाणे दरवर्षी खरिपासाठी उपलब्ध असतात. दहा जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या आणि संशोधनात अग्रेसर असल्याचे सातत्याने सांगणाऱ्या या विद्यापीठात कांदा संशोधनात मात्र फारशी प्रगती झालेली दिसत नाही. गेल्यावर्षीपासून विद्यापीठातून कांदा बियाण्यांची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली जाते. गतवर्षी कांदा बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली खरी, मात्र अनेक शेतकऱ्यांना बियाणेच मिळाले नाही.

गतवर्षी २ हजार ९६० किलो बियाणे विकले गेले. त्या तुलनेत यंदा जास्ती बियाणे उपलब्ध आहे. त्याच्या खरेदीसाठी सोमवारपर्यंत (ता.१३) पावणे अकरा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यंदा ‘फुले समर्थ’ वाणाचे १० हजार ५३३ किलो, तर ‘बसवंत ७८०’ वाणाचे २२६ किलो बियाणे उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आज (ता. १४) बियाणे विक्री होईल. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बियाणे मिळणार की यंदाही तुटवडा जाणवणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com