
NDCC Bank News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याच्या निर्णय ५ मे रोजी झालेल्या जिल्हा बँक बचाव मेळाव्यात घेण्यात आला होता. त्यानुसार बँकेने ८ मे पासून वैयक्तिक सभासद नोंदणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून पाच दिवसांत तब्बल दोन हजार सभासदांनी अर्ज सादर केले आहेत. बुधवारअखेर (ता.१७) सुमारे २ हजार ४६८ सभासदांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांना लवकरच मासिक सभेत वैयक्तिक सभासद करून घेण्यात येईल.
बँकेला ६८ वर्षांची परंपरा असून ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जात होती. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केले आहे.
यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद-शेतकऱ्याना आर्थिक मदत करून त्यांच्या शेती व शेतीपूरक कामासाठी या बँकेने अर्थसाहाय्य देऊन मोठे योगदान दिले आहे.
बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या बॅंकेला वाचविण्यासाठी वसुलीवर भर देऊन वाढलेला एनपीए कमी करणे, नवीन वैयक्तिक सभासद वाढविणे यावर भर देण्यात आला.
तसा निर्धार जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात करण्यात आला होता. बँकेचे वैयक्तिक सभासद होण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँक प्रशासनाने केले आहे.
...हे असतील अधिकार
बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणी ८ मे पासून सुरू केली आहे. बँकेच्या वैयक्तिक सभासदांना महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. बँकेच्या निवडणुकीत उभे राहणे, मतदानाचा अधिकार तसेच इतर सभासदांना जे अधिकार लागू आहेत, ते वैयक्तिक सभासदांनाही लागू राहतील.
येणाऱ्या मासिक सभेत आलेल्या अर्जाची छाननी करून मंजुरी दिली जाणार आहे. प्रति शेअर्स १ हजार मूल्य निश्चित असून सभासद होण्यासाठी अर्जदारास १० शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.