
Buldana News : राज्याने देशपातळीवर दिलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (Employment Guarantee Scheme) उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल जिल्ह्याला दोन पुरस्कार (Agriculture Award) मिळाले आहेत.
वेळेत मजुरी प्रदान करणे आणि सर्वात कमी व्यवहार नाकारल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांच्यासह अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सन २०२०-२१ पासून योजनेत उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो.
या वर्षी योजनेअंतर्गत मजुरांची वेळेत देयके प्रदान करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्याने वेळेवर १०० टक्के मजुरी प्रदान केली असल्याने जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्याचा व्यवहार नाकारण्याचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजेच फक्त ०.९ टक्का आहे. सर्वांत कमी व्यवहार नाकारल्याबद्दल रोहयो उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, जिल्हा एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
कुशल आणि अकुशल कामे करून राज्याने सतत अग्रेसर भूमिका राखली आहे. योजनेतून सार्वजनिक अणि वैयक्तिक स्वरूपाची कामे करण्यात येतात.
सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हास्तरापासून गावपातळीवर रोजगार सेवकांपर्यंत आहे.
त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येतो.
...ही केली जातात कामे
रोहयोमधून प्रामुख्याने सार्वजनिक कामांमध्ये अंगणवाडी बांधकाम, गायगोठा, शेळीमेंढी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, गोदाम बांधकाम, सिंचन विहिरी, नाडेप, व्हर्मी कंपोस्ट बांधकाम, वनीकरण, सामाजिक वनीकरण, शाळेला भिंत बांधकाम करणे, रेशीम उत्पादन, शोषखड्डे यांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.