Yavatmal District Bank : नियमित सभासदांच्या पीककर्जात दोन टक्के वाढ

Crop Loan : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षी सर्वाधिक ७५० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले होते. त्यापैकी साडेसहाशे कोटींची वसुली झाली.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Yavatmal Crop Loan Update : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Yavatmal District Central Cooperative Bank) गेल्या वर्षी सर्वाधिक ७५० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप (Distribution of crop loans) केले होते. त्यापैकी साडेसहाशे कोटींची वसुली झाली.

अजूनही १२० कोटी थकीत आहेत. येणारी वसुली व पैशांच्या उपलब्धतेमुळे यंदा बँकेने नियमित सभासदांच्या पीककर्जात केवळ दोन टक्के वाढ केली. तसा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा बँक शेतकऱ्यांना सर्वाधिक पीककर्ज देणारी एजन्सी आहे. बँकेच्या जिवावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज देताना आखडता हात घेत आहेत. दुसरीकडे जिल्हा बँक गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पीककर्ज देत आहे.

गेल्या वर्षी खरीप हंगामात बँकेने शेतकऱ्यांना ७५० कोटी कर्जाचे वाटप केले होते. वसूल केलेल्या कर्जातून शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जाते. दरवर्षी जिल्हा बँक पीककर्ज वाटपाचे धोरण ठरविते. नियमित सभासदांना पीककर्जात वाढ दिली जाते.

Crop Loan
Crop Loan In Khandesh : खानदेशात पीक कर्जवाटप संथ गतीने

खरीप हंगाम पीककर्ज वाटप धोरण ठरविण्यासाठी बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. नियमित सभासदांना यंदा पीककर्जात केवळ दोन टक्के वाढ करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांना या वेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोजकीच वाढ मिळणार आहे.

शेतीच्या खर्चात वाढ झाली आहे. बियाण्यांपासून ते खतांपर्यंत सर्वांच्याच किमती वाढल्या आहेत. त्यातुलनेत पीककर्जात दरवर्षीच नाममात्र वाढ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. नियमित पीककर्ज भरूनही दोन ते तीन टक्क्यांवर वाढ दिली जात नसल्याचा आक्षेप शेतकऱ्यांचा आहे.

वसुलीसाठी बँकेकडून प्रयत्न

१२० कोटींचे पीककर्ज अजूनही वसूल झाले नाही. त्यामुळे सध्यातरी पीककर्ज वाटपात तूट आहे. शेतकऱ्यांना जूनमध्ये कर्जाची गरज असते. त्यामुळे थकित रक्कम वसूल होईल, अशी अपेक्षा बँकेला आहे. थकित शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करून त्यांना नव्याने पीककर्ज दिले जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com