Coconut Day: जागतिक नारळ दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

गुजरातमधील जुनागड येथे नारळ विकास मंडळाचे (Coconut Development Board) केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तोमर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे.
Coconut Day
Coconut DayAgrowon

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या उपस्थितीत २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन (World Coconut Day) साजरा केला जाणार आहे.

गुजरातमधील जुनागड येथे नारळ विकास मंडळाचे (Coconut Development Board) केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तोमर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर तोमर राष्ट्रीय व निर्यात उत्कृष्टता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करणार आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी (Kailash Chaudhary) यांच्या उपस्थितीत कोची येथे कार्यक्रम होणार आहे.

Coconut Day
Coconut news:नारळाच्या करवंट्यांची मागणी का वाढतेय?

नारळ विकास मंडळ (Coconut Development Board) आणि इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी यांनी संयुक्तपणे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोची येथे २ ते ४ सप्टेंबर दरम्यान 'गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस' या विषयावर आंतराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Coconut Day
दुधाच्या विक्रीदरात आणखी वाढ नाहीः क्रिसिल

भारतात दरवर्षी नारळ विकास मंडळाच्या (Coconut Development Board) वतीने जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. 'उज्वल आयुष्य आणि भविष्यासाठी नारळ शेती' ही यंदाच्या नारळ दिनाची थीम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com