खपली गव्हाची फ्रिकेहसाठी वैशिष्ट्यपूर्ण काढणी

उत्तर पश्‍चिम सीरियातील विद्रोह्यांच्या ताब्यात असलेल्या इदलिब प्रदेशातील बिन्निश शहरांच्या परिसरामध्ये सध्या खपली गहू पिकाची काढणी सुरू आहे.
खपली गव्हाची फ्रिकेहसाठी वैशिष्ट्यपूर्ण काढणी
Khapli WheatAgrowon

सीरिया हा देश अंतर्गत कलह आणि विद्रोहामुळे भाजून निघत आहे. उत्तर पश्‍चिम सीरियातील विद्रोह्यांच्या ताब्यात असलेल्या इदलिब प्रदेशातील बिन्निश शहरांच्या परिसरामध्ये सध्या खपली गहू पिकाची काढणी सुरू आहे. विशेषतः फ्रिकेह हा पदार्थ तयार करण्यासाठी किंचित हिरव्या किंवा पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या गहू पिकाची काढणी केली जाते. त्यानंतर त्या ओंब्या शेतातच अर्धवट जाळून त्यावरील आवरण काढून टाकले जाते. त्यामुळे त्याला एक विशिष्ट वेगळी चव येते.

हा पदार्थ लॅटीन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये आवडीने खाल्ला जातो. या पदार्थांमध्ये कांदा, टोमॅटो यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या मांसाचा वापर केला जातो.

उदा.

१) इजिप्तमध्ये त्यात कबुतराच्या मांसामध्ये फ्रिकेह भरले जाते, त्याला ‘हमाम बिल- फेरिक’ असे म्हटले जाते. काही वेळा त्यात चिकनचा समावेश केला जातो.

२) ट्युनिशियामध्ये हाडांच्या मज्जेपासून बनवलेल्या सूपमध्ये मिसळले जाते. त्याला शरबत ‘फारीक बिल-मुख’ असे म्हणतात.

३) जॉर्डनमध्ये कोवळ्या बकऱ्यांच्या भाजलेल्या मांसामध्ये हिरवा वाटाणा, पाइन नट्सच्या डिश सोबत हिरव्या गव्हाची पिलाफ डिश खाल्ली जाते.

४) हिरवा गहू आणि चिकन यांपासून तयार केलेल्या पॅलेस्टाइन सूपला ‘शुर्बा अल फारीक’ असे म्हणतात.

५) सीरियामध्ये फ्रिकेह सहसा बकऱ्याचे मांस, कांदा, लोणी, काजू, काळी मिरी, दालचिनी, बडीशेप आणि मीठ यांसह खाल्ले जाते.

६) ट्युनिशिया आणि अल्जीरिया या देशामध्ये फ्रिकेह हे टोमॅटो आधारित सूपचा मुख्य भाग असते. ही पारंपरिक राष्ट्रीय डिश असून, त्याला चोर्बात फ्रिक असे म्हणतात.

७) टर्कीमध्ये फ्रिकेहला फिरिक म्हणतात. पारंपरिक दाक्षिणात्य अनाटोलियन क्युझिनमध्ये त्याचा समावेश असतो.

पारंपरिक तृणधान्याच्या तुलनेमध्ये फ्रिकेहमध्ये अधिक पोषक तत्त्व असतात. विशेषतः खपली गव्हापासून तयार केलेल्या फ्रिकेहमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक (दैनंदिन आहाराच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक) असून, तंतुमय पदार्थ (फायबर २.५ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम) आणि अन्य खनिजे मुबलक प्रमाणात असतात. तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे त्यातील शर्करा अत्यंत सावकाश विरघळते, त्याचा फायदा मधुमेही व्यक्तींसाठी होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com