Election : भीमाशंकर कारखान्याच्या निवडणुकीत १८ जागा बिनविरोध

भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे यांच्यासह काही संचालकाची बिनविरोध निवड झाली आहे.
Bhimashankar Sugar Mill
Bhimashankar Sugar MillElection

मंचर : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या (Bhimashankar Sugar Factory) संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या. तर, उर्वरित ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.

भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे यांच्यासह काही संचालकाची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच, प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, शांताराम ऊर्फ कृष्णाजी हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, भगवान बेडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, प्रिया बाणखेले, पुष्पलता जाधव, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे हे उमेदवारही बिनविरोध निवडणून आले.

Bhimashankar Sugar Mill
घोडगंगा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू

जुन्यांची माघार, नव्यांना संधी :

मावळते उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक शाहू शिंदे, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब पडवळ, भगवान बोऱ्हाडे, तान्हाजी जबुकर, कल्पना गाढवे, मंदाकिनी हाडे, रमेश कानडे यांना उमेदवारी मिळाली नाही. नवीन संचालक म्हणून अंकित जाधव, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, प्रिया बाणखेले, पुष्पलता जाधव, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे यांची वर्णी लागली. रमेश लबडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.

एका अपक्षामुळे निवडणूक

शिवसेना, भाजप पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. परंतु एका अपक्ष उमेदवारामुळे शिंगवे-रांजणी गटापुरती निवडणूक लागली. संचालकपदाच्या तीन जागांसाठी चार उमेदवार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमध्ये देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादा पोखरकर आणि अपक्ष तुकाराम बाबूराव गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे यांनी माघार न घेतल्याने शिंगवे रांजणी गटापुरती निवडणूक लागली आहे.

१७ जुलैला होणार मतदान

भीमाशंकर कारखान्याच्या निवडणुकीसाठी येत्या १७ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी मंगळवार १९ जुलै रोजी सकाळी ८ नंतर क्रीडासंकुल मंचर येथे होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com