Crop Damage : पाच जिल्ह्यांत अनेक भागात अवकाळी पावसाचा दणका

पावसाची तीव्रता मंडळनिहाय कमी अधिक असली तरी शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील अनेक भागात गत दोन दिवसापासून विजांचा कडकडाट व वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाचा गहू (Wheat), हरभरा (Chana), मका (maize), ज्वारी (jowar), या पिकांसह आंब्यासह इतरही फळ पिकांना मोठा दणका बसला आहे.

पावसाची तीव्रता मंडळनिहाय कमी अधिक असली तरी शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचीही प्राणहानी झाल्याची माहिती आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी सोमवारी(ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासात वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाने सुरू केलेले नुकसानीचे सत्र मंगळवारी(ता. ६) ही सुरूच होते. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळात ०.५ ते १५.३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर व गंगापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली.

Crop Damage
Weather Forecast : उत्तर महाराष्ट्रात पाऊस

जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २७ मंडळात कमी अधिक पाऊस झाला.

परळी, बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव तालुक्यातील तुरळक मंडळात तसेच शिरूर कासार व वडवणी या दोन तालुक्यातील सर्व मंडळात ५ मिलिमीटरपर्यंत अवकाळी पाऊस झाला.

आष्टी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासूनच वादळी वारा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे लिंबूनी संत्रा च्या बागेचे नुकसान झाले आहे.

गेवराई तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक गारासह रिमझिम पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी १४ मंडळात पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतमाळ व चाकूर तालुक्यातील मंडळांचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सर्वात कमी राहिला. या जिल्ह्यातील ४३ पैकी वाशी व कळंब तालुक्यातील प्रत्येकी एका मंडळात तुरळक पाऊस झाला.

Crop Damage
Mosambi Crop : अवकाळी पावसामुळे मोसंबीचा ताण तुटून नवती फुटण्याची शक्यता

वीज पडून पशुधन दगावले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगांव परिसरात सोमवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात महालगांव येथे रोहित्रीवर वीज पडली.

तसेच चांदेगांव येथे विष्णु पवार यांच्या शेतात विज पडुन दोन गायीचा मृत्यु झाला. याशिवाय पैठण तालुक्यातील वडजी येथे विज पडून रामेश्वर गोजरे यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com