Urea Fertilizer : चंद्रपूर जिल्ह्यात युरिया दाखल

युरिया खताचा जास्त वापर झाल्यास पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता आहे.
Urea Fertilizer
Urea FertilizerAgrowon

Chandrapur News : राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स, मुंबईकडून २८०० टन भारत युरिया जिल्ह्यात प्रथमच रॅकद्वारे प्राप्त झाला आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील सदर रॅकचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते करण्यात आले असून युरियाचे (Urea) वितरण सुरू झाले आहे.

चंद्रपूर येथील मालधक्क्यावर आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, मोहीम अधिकारी सुशांत गाडेवार, आरसीएफ कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक पानझडे, व्हीसीएमएफचे जिल्हा व्यवस्थापक हालोळे उपस्थित होते.

मालधक्यावरील मजुरांशी संवाद साधताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘‘येथील रॅक पॉइंटचे सिमेंटीकरण करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

यात शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींचा समावेश असून मजुरांच्या समस्यांबाबत रेल्वे विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा. पुढील चार-पाच महिन्यांत सर्व सोयीसुविधा मजुरांसाठी येथे उपलब्ध झाल्या पाहिजे, अशा सूचना त्यांनी रेल्वे विभागाला दिल्या.

Urea Fertilizer
Bio Fertilizers : जैविक खतांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात?

सद्यःस्थितीत जिल्ह्यात पिकांच्या गरजेनुसार मुबलक रासायनिक खतसाठा उपलब्ध आहे. परंतु, शेतकरी बांधवांनी रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता पिकांच्या गरजेनुसारच रासायनिक खताचा संतुलित वापर करावा.

तसेच युरिया खताचा जास्त वापर झाल्यास पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सद्यःपरिस्थितीत गहू या पिकाला विद्यापीठाच्या रासायनिक खताच्या मात्रेनुसार युरिया खत देण्यात यावे.

परंतु, हरभरा हे पीक घाटे धारण करण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यास नत्राची आवश्यकता नाही. आजच्या परिस्थितीत हरभरा या पिकास युरिया दिल्यास पिकाची काईक (शाखा व पानांची) वाढ होऊन त्यामुळे अंदाजे २० ते २५ टक्क्यांनी उत्पन्नात घट येऊ शकते.

रब्बी हंगाम २०२२-२३ साठी नत्र, स्फुरद व पालाश या मुलद्रव्यांचा विचार करून एकूण ५६ हजार ४९७ टन रासायनिक खताची मागणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे सादर केल्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून ४१ हजार ९७० टन रासायनिक खतांचे वाटप मंजूर केले आहे.

यामध्ये युरिया २१ हजार ९७० टन, डीएपी १ हजार ६२० टन, एसएसपी ८ हजार २५० टन, एमओपी ५०० टन, संयुक्त खते ९ हजार ६३० टनचा समावेश आहे. या वाटपाप्रमाणे ५८ हजार ८१५.४० टन रासायनिक खत रब्बीसाठी उपलब्ध झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com