आरोग्यासाठी सायकल वापरा

पूर्वी आजोबांच्या काळात कामावर जाताना सर्रास सायकल वापरली जायची. सध्याच्या काळात सायकल वापरणे कमीपणाचे लक्षण आहे, असा एकूण समज दिसून येतो.
Cycle
Cycle Agrowon

शंकर बहिरट

--------------

आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे आपली प्रगती होत आहे. हे जरी खरे असले तरी सध्याच्या काळात सायकलचा वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. सायकलचा प्रवास पर्यावरणपूरक आहे. ध्वनी आणि वायुप्रदूषणमुक्त आहे. पूर्वी आजोबांच्या काळात कामावर जाताना सर्रास सायकल वापरली जायची. सध्याच्या काळात सायकल वापरणे कमीपणाचे लक्षण आहे, असा एकूण समज दिसून येतो. निवांतपणा असेल किंवा घाईचे काम नसेल तर मी शक्यतो पायी चालतो किंवा सायकल वापरतो.

Cycle
Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

अशा वेळी रस्त्यावर आजूबाजूचे लोक काळजीने विचारपूस करतात. ‘बीपी, शुगर वगैरे नाही ना, का डॉक्टरने असे सांगितले आहे,’’ म्हणजे डॉक्टरने सांगितले तरच पायी चालावे किंवा सायकल वापरावी, असा एकूण प्रघात पडला आहे. सकाळी लवकर उठून पायी चालणाऱ्यांची, सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ लोक आरोग्याच्या दृष्टीने खूप जागरूक झाले आहेत. त्यातील बहुतेक लोक काहींना काही आजाराने ग्रस्त झालेले असतात. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना रोज चालण्याचा किंवा सायकलिंगचा व्यायाम करावा असा सल्ला दिलेला असतो.

Cycle
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

आजार झाल्यावर उपाय म्हणून व्यायाम करण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. जवळपास जायचे असेल किंवा कामाचे ठिकाण दहा-पंधरा किलोमीटरवर असेल तर सायकलचा वापर करायला हवा. त्यामुळे धावपळीच्या जीवनात व्यायामासाठी राखीव वेळ काढायची गरज भासत नाही. पेट्रोलचे पैसे वाचतील, वायुप्रदूषण होणार नाही शिवाय शहरात रहदारी खूप असल्याने प्रवासाच्या वेळेत फारसा फरक पडत नाही.

माझा अभिजित नावाचा मित्र आहे. त्याने पुण्यात ‘सायकल टू वर्क’ ही चळवळ चालवली आहे. फक्त छंद किंवा व्यायाम नाही तर ‘कामावर जाताना सायकल वापरा’ असे स्वतः कामावर जाताना सायकल वापरून तो प्रबोधन करीत असतो. लग्न ठरल्यावर मोबाईल किंवा इतर भेट देण्याऐवजी अभिजितने आपल्या वैवाहिक प्रवासाची सुरुवात पत्नीला सायकलची भेट देऊन केली होती. अभिजितचा आदर्श घेऊन आम्ही इतर मित्रही सायकल वापरू लागलो. इतरांना सायकल वापरायला सांगू लागलो. घरात व्यायामासाठी महागडे ट्रेडमिल किंवा सायकलिंग मशिन घेण्यापेक्षा कामावर जाताना सायकलचा वापर करणे अधिक चांगले.

सायकल वापरताना मला लोक काय म्हणतील, हे आपल्या आरोग्यापेक्षा अजिबात महत्त्वाचे नाही. दिवसेंदिवस वाढत राहणारी महागाई, रहदारीच्या समस्या, वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन, बैठे काम इ. मुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. सायकल वापरण्याची सुरुवात स्वतःपासून करूया. आपले अनुकरण हळूहळू आपल्या आजूबाजूचे लोकही करतील. कामावर जाण्यासाठी सायकल वापरा. बचतही होईल आणि आरोग्यही सुधारेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com