Land Management : जमिनीचा चिभडपणा कमी करण्यासाठी सबसॉयलरचा वापर करा

जमिनीचा चिभडपणा कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित सबसॉयलरचा वापर करावा, असा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिला.
Land Management
Land ManagementAgrowon

Jalna News : जमिनीचा चिभडपणा कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित सबसॉयलरचा वापर करावा, असा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे (Agriculture Science Center) कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने बुधवारी (ता. ५) आयोजित केलेल्या कृषी विज्ञान मंडळाच्या (Board of Agriculture Sciences) ३०८ व्या मासिक चर्चासत्र प्रसंगी चिभड जमिनीचे व्यवस्थापन (Land Management) या विषयावर ते बोलत होते.

श्री. वासरे म्हणाले, की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी चिभड झाल्या. त्यामुळे योग्य निचरा न झाल्यामुळे पीक उत्पादनात घट होत आहे. जमिनीत भूमिगत चर काढणे, जिप्समचा वापर करणे, हिरवळीची पिके घेणे यासोबतच सबसॉयलरचा वापर फायदेशीर आढळून आल्याचे ते म्हणाले.

Land Management
Animal Science Diploma : आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर

या वेळी शेतकऱ्यांना सबसॉयलरचे प्रात्यक्षिकसुद्धा दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिरत्न विजय अण्णा बोराडे, तर निवृत्त प्रकल्प संचालक आत्मा, हिंगोली तथा माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना भीमराव रणदिवे, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, वडोद तांगडा, ता. भोकरदन येथील महिला सरपंच मनीषा वास्कर, त्यांचे पती वर्धमान वास्कर, प्रगतिशील शेतकरी जयकिशन शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने भीमराव रणदिवे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

वारुडी, ता. बदनापूर येथील प्रयोगशील शेतकरी जयकिशन शिंदे यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर वडोद तांगडा, ता. भोकरदन येथील महिला सरपंच सौ. मनीषाताई वास्कर यांनी गावातील डीजे आणि दारूबंदीचा ठराव घेतल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com