
डॉ. प्रकाश बंडगर
सौर ऊर्जा ः (Solar)
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही एक शाश्वत ऊर्जा आहे.घरगुती, कृषी आणि कृषी-औद्योगिक उपयोगासाठी सौर ऊर्जेचा व्यापक वापर केला जातो.
सौर कुकर ः
अप्रत्यक्ष प्रकारच्या सौर कुकरमध्ये पारदर्शक खिडकीसह ज्याद्वारे सूर्यप्रकाश इन्सुलेटेड बॉक्समध्ये प्रवेश करतो. ऊर्जा शोषून घेतली जाते.असे सौर कुकर घरगुती स्वयंपाकासाठी आणि व्यावसायिक कारणांसाठी विकसित करण्यात आले आहेत.
सौर शुष्क (ड्रायर) ः
विविध शेतीमाल वाळविण्याचे प्रमाण वाढविणे आणि उत्पादनाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने सोलर ड्रायर विकसित करण्यात आले आहेत. सक्तीच्या संवहन सौर शुष्कामध्ये हवेची हालचाल पॉवर ब्लोअरद्वारे होते. नैसर्गिक संवहन सौर शुष्कामध्ये हवेची हालचाल नैसर्गिक पद्धतीने होते.
सौर फोटोव्होल्टिक प्रणाली ः
सोलर फोटोव्होल्टिक (एसपीव्ही) तंत्रज्ञानात सोलर सेलवर पडणाऱ्या सौर किरणोत्सर्गाचे कोणत्याही पर्यावरणीय प्रदूषणाशिवाय थेट विजेमध्ये रूपांतर केले जाते.
पर्यावरणाला हानी न पोहोचवता पाणी उपसण्यासाठी सोलर पंपिंग पद्धती उपयुक्त आहे. डीसी पृष्ठभाग पंप कमी हेडवर उच्च प्रवाहासाठी विकसित केले आहेत. डीसी फ्लोटिंग पंप विस्तृत प्रवाह आणि उच्च हेड या परिस्थितीसाठी योग्य आहेत.
सोलर विद्युत कुंपण ः
सोलार पॅनलद्वारे डीसी विद्युत प्रवाह सौर ऊर्जेचा वापर करून तयार होतो. निर्माण झालेला विद्युत प्रवाह बॅटरीमध्ये साठवला जातो. बॅटरीला एनर्जाइजर जोडलेला असतो. तो मोठ्या प्रमाणात विजेचा दाब तयार करतो. हा प्रवाह कुंपण तारेला जोडलेला असतो.
जेव्हा एकदा प्राणी किंवा वस्तु कुंपणाच्या संपर्कात येते, तेव्हा संपूर्ण संच एकमेकांना जोडला असल्याकारणाने त्यांच्यामधून विद्युत प्रवाह सुरू होतो. त्यामुळे झटका बसतो, पण झटक्याचा कालावधी हा ०.०३ सेकंद इतका कमी असल्याने कोणतीही इजा होत नाही, ते प्राणीही तिथे थांबत नाही.
पवन ऊर्जा ः
४०० वॅट ते ४० किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त लहान पवन जनरेटर संपूर्ण शेतीसाठी विजेची गरज पूर्ण करतो. या प्रकारात अधिक संशोधन सुरू आहे.
जलविद्युत ऊर्जा ः
जलविद्युत प्रणालींचे प्रमाण आणि वापर वेगवेगळा असतो. सर्वात लहान जलविद्युत प्रणाली म्हणजे सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प. याची वीज उत्पादन श्रेणी १ किलोवॅट ते १ मेगावॉट आहे. मोठ्या क्षेत्रावरील जलविद्युत यंत्रणांमुळे भरपूर वीज निर्मिती होऊ शकते. या यंत्रणेत संपूर्ण गावे आणि शहरांना वीज देण्याची क्षमता असते.
बायोमास ऊर्जा ः
जैवइंधननिर्मितीसाठी कृषी कचरा, लाकूड आणि पालिकेचा कचरा यासारख्या पदार्थांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. जैवइंधनाच्या उत्पादनासाठी विविध वनस्पतींचा वापर वाढला आहे.
जैव इंधन ः
बायोमास हा बायोडिझेल आणि इथेनॉल सारख्या जैवइंधनाचा अक्षय स्रोत मानला जातो. ऑस्ट्रिया, स्वीडन आणि अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये जैवइंधनाचा वापर वाहने आणि यंत्रांना ऊर्जा देण्यासाठी केला जातो.
बायोचार ः
बायोचार हे बायोमासच्या पायरोलिसिस प्रक्रियेचे एक उपउत्पादन आहे. शेती आणि इतर पर्यावरणीय वापरासाठी हा ऊर्जेचा मौल्यवान स्रोत मानला जातो. जेव्हा बायोमास सडतो किंवा जळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वातावरणात सोडला जातो.
तथापि, असे उत्सर्जन बायोचार बनवून रोखले जाऊ शकते. जेव्हा बायोचार पुन्हा मातीत मिसळला जातो, तेव्हा ते आजूबाजूच्या वातावरणातील कार्बन शोषून घेऊ शकतात.जे मातीची गुणवत्ता राखण्यासाठी फायदेशीर आहे.
बायोगॅस ः
बायोगॅस हा एक अक्षय ऊर्जा स्रोत आहे, जो विशिष्ट जीवाणूद्वारे सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामुळे तयार होतो. हे मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडचे मिश्रण आहे. शेतीतील कचरा, अन्नाचा कचरा, जनावरांचे शेण, सांडपाणी यापासून बायोगॅस तयार होतो. याची स्लरी पिकांसाठी पोषक असते.
संपर्क ः डॉ. प्रकाश बंडगर,९७६४४१०६३३, (सहाय्यक प्राध्यापक, अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग,डॉ.डी.वाय.पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.