
Crop Protection : पीक संरक्षणासाठी विविध जैविक घटकांचा (Organic components) वापर वाढत आहे.
त्यामध्ये किडी-रोगांवर हल्ला करणारे विविध जिवाणू, बुरशी, विषाणू यांचा वापर केला जातो.
त्यात एक महत्त्वाचा घटक म्हणजे मातीमध्ये मुळांच्या परिसरात राहून कार्य करणारे सूत्रकृमी (Nematodes) पिकासाठी उपयुक्त आणि हानिकारक अशा दोन्ही प्रकारच्या सूत्रकृमी आढळतात.
त्यांच्या खाण्याच्या किंवा शिकार करण्याच्या पद्धतीही भिन्न आहेत. उदा. काही एका जागी राहून जवळ येणाऱ्या त्यांच्या भक्ष्यावर हल्ला करतात, तर काही स्वतः भक्ष्याचा शोध घेऊन त्यावर हल्ला करतात.
१) कॅसिया ः
एका जागी स्थिर राहून जवळ येणाऱ्या भक्ष्यावर हल्ला करणाऱ्या गटामध्ये कॅसिया सूत्रकृमी व त्याची एक जात (Steinernema carpocapsae) येते.
२) कॅप्रियल ः
त्यातील Steinernema feltiae हे उपयुक्त सूत्रकृमी आहेत. त्यांच्यामध्ये एका जागी स्थिर राहून हल्ला करणारे किंवा भक्ष्याचा शोध घेऊन हल्ला करणे असे दोन्ही गुणधर्म दिसून येतात.
विशेषतः वनस्पतींना हानिकारक अशा किडींवर हल्ला करत असल्यामुळे पीक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. ते भक्ष्याचा शोध घेण्यासाठी त्यापासून येणाऱ्या संप्लवनशील अशा संयुगांच्या गंधावर अवलंबून असतात.
अलीकडे जैविक नियंत्रण उद्योगामध्ये कार्यरत काही परदेशी कंपन्यांनी हे दोन्ही सूत्रकृमीयुक्त उत्पादने बाजारात उतरवली आहेत. ती मातीतून येणाऱ्या किंवा पिकावरील किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यंत कार्यक्षम पद्धती असल्याचा दावा कंपनी करत आहे.
हे सूत्रकृमी वाळवी, हुमणी, अळीवर्गीय काही किडी आणि फुलकिडे यांच्यावरही हल्ला करून काही काळातच मारून टाकतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.