वाट पाहण्याचे शिक्षण

इंग्रजीत एक म्हण आहे ‘जॅम यस्टर्डे, जॅम टुमारो, बट नो जॅम फॉर टुडे.’ म्हणजे आई आपल्या मुलाला/मुलीला समजावते आहे की काल खाऊ दिला आहे ना? उद्या पण खाऊ देईन, पण आज खाऊ मिळणार नाही.
वाट पाहण्याचे शिक्षण
मशागत लेखAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

इंग्रजीत एक म्हण आहे ‘जॅम यस्टर्डे, जॅम टुमारो, बट नो जॅम फॉर टुडे.’ म्हणजे आई आपल्या मुलाला/मुलीला समजावते आहे की काल खाऊ दिला आहे ना? उद्या पण खाऊ देईन, पण आज खाऊ मिळणार नाही. या प्रसंगातली आई आपल्या मुला/मुलीसोबत कठोर वागते आहे असं वरकरणी आपल्याला वाटू शकतं. पण जरा खोलात जाऊन विचार केला असता लक्षात येईल की तिचं हे असं वागणं आपल्याला नक्कीच पटतं. मुलं म्हणतील ते, देत गेलो तर आपणच त्यांना पांगळे करतो. त्यांना वाट पाहायला शिकवलं पाहिजे.

तोंडातून शब्द बाहेर पडला म्हणजे ही वस्तू लगेच हजर होणार ही सवय मुलाला लागता कामा नये. कितीतरी लोकांचा हा नक्कीच समान अनुभव असेल. ते जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा परीक्षेची, शाळेची फी भरण्याची वेळ आली की त्यांना काही घरून लगेच पैसे मिळत नसत. शाळेत शिक्षकांनी दोन चार वेळेस पाठपुरावा केला की मग घरचे फीचे पैसे देत असत. त्या वेळची परिस्थिती बेताची होती म्हणूनही उशीर होत असला तरी त्यातून नकळत वाट पाहायचे शिक्षण होत असे. या वाट पाहण्याचा शिक्षणामुळेच व्हायचं काय की पैशाची किंमत समजत असे.

आज होतंय काय की सगळीकडच्या शाळा या इंग्रजाळलेल्या आहेत. सर्व गोष्टी एकदम चकाचक असतात. मुलांचे गणवेश, बूट, दप्तर आदी जरा शिसपेन्सिल जरी मोडली आणि घरी सांगितलं की पालक लगेच ती आणून देतात. अशा गोष्टीमुळे मुलांना हेच समजत नाही की त्यांचे आई-वडील त्यांच्यासाठी किती कष्ट करत आहेत ते? तेच मुलांना एखादी गोष्ट देण्याआधी जरा वाट पाहायला लावली तर त्यांना पैशाची, दिलेल्या वस्तूंची, दिलेल्या वेळेची किंमत तरी कळेल! मुले ती वस्तू जपून वापरतील. आता सर्वच बाबतीत वाट पाहायला लावायचं असही काही नाहीये. नाहीतर एखादा फॉर्म भरायचा आहे मग मुलाला/मुलीला वाट पाहायला लावू. असं केल्यावर त्याची/तिची फॉर्म भरण्याची तारीख हुकली जाऊ शकते.

पर्यायाने आपल्याच पाल्याचे मोठे नुकसान होऊ शकते. आजकाल तर फोन मधली एखादी गोष्ट जर पटकन डाऊनलोड झाली नाही तरी मुले चिडचिड करतात. मुलं अस्थिर होऊ नये असं वाटत असेल तर मुलांना वाट पाहण्याचं शिक्षण दिले गेले पाहिजे. यात शाळेबरोबर कुटुंबाचाही लक्षणीय सहभाग असला पाहिजे, तर ही मूल्य मुलांमध्ये रुजली जातील. मुलांचं संकटातही मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी हे वाट पाहण्याची शिक्षण महत्त्वाचे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com