Kabaddi Game : कबड्डी खेळाची परंपरा जोपासलेले वडगाव सहाणी

पुणे जिल्ह्यातील वडगाव सहाणी (ता. जुन्नर) हे गाव बागायती व समृद्ध शेतीसाठी ओळखले जाते. पण त्याहून या गावाची खरी ओळख आहे ती कबड्डी या पारंपरिक खेळाचा वारसा जपण्यासाठी. गावात विविध कबड्डी संघ कार्यरत आहेत.
Kabaddi Game
Kabaddi Game Agrowon

विविध गावे विविध कारणांसाठी प्रसिद्ध असतात. एखादे विशिष्ट पिकासाठी, एखादे मंदिरासाठी,
नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. पुणे जिल्ह्यात वडगाव सहाणी हे जुन्नर तालुक्यातील असेच एक गाव आहे. सुमारे १८०० लोकसंख्येचे व सिंचन सुविधांमुळे शेतीत (Agriculture) समृद्ध असलेल्या इथल्या गावशिवारात बारमाही फळे, भाजीपाला पिकांसह ऊस, द्राक्ष आदी पिके (Crop) फुलताना आढळतात.

Kabaddi Game
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

बहुतांश शेतीमाल विक्रीसाठी मुंबईला पाठविला जात असल्याने गावातील घरटी एक माणूस मुंबईत असतो. याच वडगाव सहाणीने कबड्डी या पारंपरिक खेळाचे संवर्धन करणारे व खेळाडू घडविणारे गाव अशीही वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार केली आहे.

कबड्डीची परंपरा

गावातील ओमसाई कबड्डी संघाचे प्रशिक्षक प्रदीप भोर यांनी गावातील कबड्डीच्या परंपरेविषयी माहिती दिली. पूर्वी गावात गोकुळाष्टमीला दहीहंडीबरोबरच पारंपरिक हुतूतू खेळ खेळला जायचा. त्यानंतर मारुती मंदिराच्या पटांगणात कबड्डीच्या स्पर्धा घेण्याची परंपरा सुरू झाली. त्यास ६० ते ७० वर्षे झाली. त्यातून चांगले खेळाडू तयार होऊ लागले.

Kabaddi Game
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

सन १९७३ मध्ये वायुकुमार कबड्डी संघाची स्थापना ज्येष्ठ व्यक्ती सीताराम खंडुजी तांबोळी, शिवाजी बापूजी भोर, जे. एल. वाबळे आणि सहकाऱ्यांनी केली. वाड्या-वस्त्या, मग विविध देवतांची मंदिरे, त्या नावाने मंडळे आणि त्यांचे कबड्डी संघ असा विकास होत गेला. संघ वाढले तसे मग गोकुळाष्टमीला गावात स्पर्धा वाढू लागल्या आणि सरस खेळाडू निर्माण झाले.

फेडरेशनकडे नोंदणी

सध्या गावात पाच संघ असून, ते तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धा खेळतात.
त्यात विविध गटांतील सुमारे १०० ते १५० खेळाडूंचा समावेश आहे. या संघांची पुणे जिल्हा कबड्डी फेडरेशनकडे नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा आणि राज्य पातळीवरील निवड चाचणीसाठी खेळाडू पात्र ठरतात. संघांना त्यासाठी ये-जा करण्यासाठी भोर यांनी चारचाकी खरेदी केली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंमध्ये मयूर भोर, राजेंद्र भोर, सागर तांबोळी, विशाल तांबोळी आदींची नावे सांगता येतील.

Kabaddi Game
Agri Business : ‘ॲग्री बिझनेस’ कौशल्य विकसित करणारा अभ्यासक्रम ः डॉ. कौसडीकर

स्वतंत्र ‘स्टेडियम’

माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या खासदार निधीतून कबड्डी क्रीडांगण उभारण्यात आले. आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्यातून आणि लोकवर्गणीतून मोठे ‘स्टेडियम’ उभारण्यात येत आहे. आठ लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक मॅट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस आणि थंडीतही ‘इनडोअर’ सराव करणे शक्य होत आहे. वाड्या-वस्त्यांवरील प्रत्येक मंदिरालगतही खुल्या आणि बंदिस्त स्वरूपाचे मैदान उभारण्यात आले आहे. येथे दैनंदिन सराव चालतो.

प्रतिक्रिया

गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कबड्डीचा खेळ गावात रुजवला आहे. यासाठी विविध पायाभूत सुविधा विविध माध्यमांमधून उपलब्ध झाल्या. मीदेखील कबड्डी खेळाडू
म्हणून घडल्याचा अभिमान आहे. विवाह झाल्यानंतर आता त्यावर बंधने आली. मात्र गावातील मुले व तरुणांना कबड्डीचे प्रशिक्षण देण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


वैशाली तांबोळी सरपंच, वडगाव सहाणी
संपर्क, ९०२२५२८३५८

Kabaddi Game
Crop Damage : ओल्या दुष्काळासाठी परभणीत बेधडक मोर्चा

अलीकडील काळात अन्य व्यावसायिक खेळांमुळे कबड्डीसारखे पारंपरिक खेळ दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे कबड्डी खेळाचे संवर्धन व्हावे, विविध खेळाडू तयार व्हावेत यासाठी पूर्वजांचा वारसा आम्ही चालवत आहोत. या माध्यामातून गावात रोज कबड्डीचा सराव घेतला जातो. यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आम्ही खेळत असतो.

खेळामुळे मुले व्यसनांपासून दूर राहतात. तर शारीरिक आणि मानसिक सक्षम होऊन, विविध क्षेत्रांत त्याचा फायदा त्यांना आयुष्यातील जडणघडणीत होत आहे. कबड्डीसाठी आता आम्ही गावात अत्याधुनिक स्टेडियम उभारत आहोत.


प्रदीप भोर, ९९७०३२१८४८
संघ प्रशिक्षक - ओमसाई कबड्डी संघ

प्रो कबड्डी लीगसारख्या स्पर्धांमुळे कबड्डीला चांगले दिवस आले आहेत. आमच्या गावातील काही खेळाडू तिथपर्यंत पोहोचले आहेत. अद्याप निवड झाली नसली, तरी आम्ही प्रयत्नशील आहोत.
तुषार वाबळे
संचालक, विघ्नहर सहकारी साखर कारखाना
शिरोली, ता. जुन्नर
९८९०८८११४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com