Vanrai Sanstha : 'वनराई'ने घेतला शाश्‍वत ग्राम विकासाचा ध्यास

सन १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे ‘मानव पर्यावरण’ या विषयावर पहिली जागतिक पर्यावरण परिषद झाली. या परिषदेमुळे पर्यावरण या विषयाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्या वेळी स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. मोहन धारिया (अण्णा) केंद्रीय नियोजन मंत्री होते.
Vanrai Sanstha
Vanrai SansthaAgrowon

अमित वाडेकर

सन १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे ‘मानव पर्यावरण’ (Hunan Environment) या विषयावर पहिली जागतिक पर्यावरण परिषद (Global Environment Conference) झाली. या परिषदेमुळे पर्यावरण या विषयाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्या वेळी स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. मोहन धारिया (Dr. Mohan Dharia) (अण्णा) केंद्रीय नियोजन मंत्री होते. ते राष्ट्रीय नियोजनाच्या अनुषंगाने भारतासमोर असलेल्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना अभ्यासत होते. अमर्याद वृक्षतोड, वाढती लोकसंख्या (Population) आणि प्रदूषण (Pollution) यामुळे देशाची परिस्थिती चिंता करण्याजोगी झाली होती. महाराष्ट्र दुष्काळात (Drought) होरपळत होता.

Vanrai Sanstha
Rural Development : ग्रामसमृद्धीचा पाया रचणारे ग्रामसेवा मंडळ

हे चित्र बदलण्याकरिता वनीकरण आणि हरित भारतासाठी जनआंदोलन पुकारावे लागेल, हे बीज अण्णांच्या मनात रुजले. याचाच अंकुर पुढे ‘वनराई’च्या रूपाने उगवला. राष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वोच्च पदाची संधी असताना अण्णांनी सक्रिय राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून १९८२ मध्ये ‘वनराई’च्या कार्याला सुरुवात केली.

Vanrai Sanstha
Save Soil : क्रिस्टीन जोन्स यांचे ‘जमीन वाचवा’ अभियान

त्यांनी कृषी विद्यापीठांना भेटी देऊन तिथल्या तज्ज्ञांसोबत विचारमंथन केले. अनेक जिल्ह्यांचे दौरे केले. खेड्यापाड्यांतील वाड्या-वस्त्या पिंजून काढत तळागाळातले प्रश्‍न समजून घेतले. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनाची गरज आणि आगामी आव्हाने विचारात घेऊन त्यांनी पुढील कामाची दिशा ठरवली. त्यांनी १० जुलै, १९८६ रोजी सार्वजनिक विश्‍वस्त कायद्यांतर्गत वनराई संस्थेची स्थापना केली.

मृदा-जल-वन संवर्धन

वनीकरण, वृक्ष लागवड करणे, वृक्षतोडीला आळा घालणे, वनसंवर्धनाविषयी जनजागृती करणे असे उपक्रम ‘वनराई’च्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात राबवले जाऊ लागले. संस्थेने नंतर वनीकरणाबरोबरच जलसंवर्धन आणि मृदासंवर्धनाचे कार्य हाती घेतले...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com