Nagar Crop Damage : नुकसान पाहणीसाठी विखे-थोरातांची चढाओढ

नगर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सरसावले.
Minister Radhakrishna Vikhe
Minister Radhakrishna VikheAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrishna Vikhe) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सरसावले.

दोन्हीही नेत्यांनी एकाच दिवशी एकाच गावात पिकांची पाहणी केली. सकाळी थोरात यांनी पाहणी केली दुपारी विखेही तेथे पोहोचले. त्यामुळे मसाल्याची पाहणी करण्यासाठी दोन्ही नेत्यात चढाओढ लागल्याचे नगर जिल्हा पाहतो आहे.

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे १३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका बसला.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी तातडीने पंचनामाच्या सूचना देत झालेल्या नुकसानीची जिल्हाभर पाहणी सुरू केली.

Minister Radhakrishna Vikhe
Bhausaheb Thorat Sugar Mill: भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गाळपाची उद्या सांगता

माजी महसूलमंत्री थोरात यांनीही संगमनेर तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बु., पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी या गावांमधील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार थोरात यांनी केली.

यावेळी समवेत डॉ. जयश्रीताई थोरात व अन्य पदाधिकारी होते. सकाळी थोरात पाणी केल्यानंतर याच भागातील निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, सावरचोर, सांगवी आधी गावात जाऊन गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

दोन्ही नेते दिवसभर एकाच भागात असल्याने यंत्रणांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. पाहणीनंतर विखे यांनी शिर्डीत आढावा बैठक घेऊन संगमनेर तालुक्यातील नुकसानीसाठी सहा कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

विखे पाटील यांनी पाहणी केलेली सर्व गावे माजी महसूल मंत्री थोरात यांच्या मतदारसंघातील आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष लोक अनुभवत आहेत.

थोरातांच्या सूचनांचा विचार करू : विखे

माजी महसूलमंत्री थोरात राहाता तालुक्याचा दौरा करणार असल्याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, ‘‘की यात गैर काय? ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ असून, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी पाहणी करून काही सूचना केल्या तर निश्चित त्याचा विचार करू’’. राहाता हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मतदार संघ आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com