Groundnut Production : उन्हाळी भुईमुगासाठी ग्रामबीजोत्पादन अभियान

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना जीजेजी ३२ या वाणाचे ४० किलो बियाणे अनुदानावर एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत वितरित करण्यात येणार आहे.
Groundnut Crop
Groundnut CropAgrowon

Amravati News : राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत (National Edible Oil Campaign) या वर्षी उन्हाळी हंगामामध्ये (Summer Season) भुईमूग या पिकांकरिता महाबीज ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविणार आहे.

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर एक एकर मर्यादेत बियाणे देण्यात येणार आहे.

प्रतिकूल हवामान व जनावरांचा त्रास यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेरा कमी केला आहे.

त्याचा एकूणच परिणाम राज्यातील उत्पादकतेवर पडला असून, आता महाबीजमार्फत राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत भुईमूग बियाण्याकरिता ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या सात विभागांतील २५ जिल्ह्यांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक भर अमरावती व लातूर विभागावर केंद्रित करण्यात आला आहे.

Groundnut Crop
हिंगोलीमध्ये भूईमूग शेंगा प्रतिक्विंटल ५५०० ते ६००५ रुपये

अनुदानावर बियाणे

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना जीजेजी ३२ या वाणाचे ४० किलो बियाणे अनुदानावर एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत वितरित करण्यात येणार आहे.

एक एकरापेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे ‘महाबीज’च्या अधिकृत विक्रेत्याकडून घ्यायचे आहे. अनुदानाकरिता केंद्र व राज्याने २ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना ४२०० रुपयांत ४० किलो बियाणे मिळणार आहे.

बीजोत्पादनासाठी प्रशिक्षण

शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षणही देण्यात येणार असून, प्रत्येक शेतकऱ्याने उत्पादित बियाणे योग्यरीतीने जतन करून पुढील दोन हंगामाकरिता बीजगुणन करून स्वतःसाठी व उर्वरित बियाणे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध होईल, असे नियोजन करायचे आहे.

Groundnut Crop
Summer Sowing : पाच जिल्ह्यांत १९ हजार हेक्‍टरवर उन्हाळी पीक पेरणी

अमरावती व लातूर विभागावर भर

अमरावती व लातूर विभागात उन्हाळी भुईमुगाचा पेरा अधिक राहतो. गेल्या काही वर्षांत पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट आली आहे. प्रतिकूल हवामान, पाण्याची कमतरता व वन्यपशूंचा त्रास, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी कमी केली आहे.

हे क्षेत्र पुन्हा वाढावे, यासाठी या दोन विभागांवर अधिक भर देण्यात येत असून, अमरावतीसाठी ४४००, तर लातूर विभागासाठी ७७५ क्विंटल बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com