Shivsena News : शेतकरी, कष्टकरी रुग्णांसाठी ‘गाव तेथे वैद्यकीय सहायक’

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी एक लाख ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असण्याची अट आहे.
Shivsena News
Shivsena News Agrowon

Nagar health News : शेतकरी, कष्टकरी, कामगार व सामान्य माणसांना रुग्णालयातील महागड्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायतामधून निधीतून मदत केली जाते. त्यासाठी शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष काम करत आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना ही मदत मिळण्याबाबतची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ‘शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष’ कडून राज्यात गाव तेथे वैद्यकीय सहायक नियुक्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख राम राऊत यांच्यासह कक्षांसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

Shivsena News
Mosambi Orchard : चांगल्या उत्पादनासाठी मोसंबी बागांचे आरोग्य जपा

कुटुंबाचे उत्पन्न कमी असलेल्या गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर व असहाय्य रुग्णांना अधिकच्या रकमेमुळे गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अडचणी येतात.

त्यामुळे अशा रुग्णांना मदतीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आधी ओमप्रकाश शेटे व आता मंगेश चिवटे काम पाहत आहेत.

या योजनेतून निधी मिळवण्यासाठी ग्रामीण लोकांना अडचणी येतात. त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी काही वर्षांपासून ‘शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष’ व ‘श्रीकांत शिंदे यांचे फाउंडेशन राज्यात काम करत आहे.

लोकांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून मदत करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्यांची ‘वैद्यकीय सहायक’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. नगर शहर व जिल्ह्यासाठी काका शेळके, ॲड. अनिकेत कराळे, रणजीत परदेशी आंदीची नियुक्ती केली आहे.

Shivsena News
Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात साकारले ‘संवेदना उद्यान’

उत्पन्नाची अट वाढीसाठी प्रयत्न

योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. हा दाखला काढण्यासाठी ‘वैद्यकीय सहायक’ मदत करतील.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी एक लाख ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असण्याची अट आहे. ही अट तीन लाख साठ हजारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे राम राऊत यांनी सांगितले.

शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाकडून केलेल्या पाठपुराव्यामुळे आतापर्यत पाच लाख लोकांना मदत करता आली. सहा महिन्यात सुमारे ३८ कोटी रुपयांचे वाटप झाले. महाराष्ट्रातील रुग्ण असेल आणि परराज्यात उपचार घेत असेल तरीही मदत देता येईल, असे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com