Kharif Season Update : चांदूरबाजार तालुक्‍यात गावोगावी शेतकरी जागृतीसाठी अभियान

Kharif Season : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये हंगामपूर्व मार्गदर्शनावर भर दिला आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season Amravati News : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये हंगामपूर्व मार्गदर्शनावर भर दिला आहे. त्याकरिता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी जागृतीचा अभिनव उप्रकम राबविला जात आहे.

Kharif Season
Kharip Meeting: बाळासाहेब थोरातांनी खरीप हंगाम आढवा बैठक

खरीप हंगामात खते, बी-बियाणे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, निविष्ठांचे पथ‍के आणि नियमानुसार बिल घेणे, बियाण्यांची उगवणशक्‍ती तपासणे, उगवणशक्‍ती अपेक्षित नसल्यास संबंधित लॉटच्या बियाण्यांविषयी तक्रार करण्याची पद्धती, कमी उगवणशक्‍ती असलेले बियाणे परत करणे, बियाणे न उगवल्यास करावयाची तक्रार, त्याकरिताचा नमुना, एखाद्या प्रकरणात फसवणूक झाल्यास त्यानंतर करावयाची प्रक्रिया यांसह विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज भासते.

ही बाब लक्षात घेता चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी एस. पी. दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात गावागावात जागृतीवर भर देण्यात आला आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.

चांदूरबाजार तालुक्‍याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८५०४ इतके असून खरीप पेरणीखालील क्षेत्र ४३७४६ हेक्‍टर आहे. शेतकऱ्यांनी जादा दरात निविष्ठांची कोणी विक्री करीत असल्यास त्याबाबत कृषी विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुधारीत बियाण्यांचा वापर, नव तंत्रज्ञानाचा वापराविषयी माहिती दिली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com