Akluj Agriculture Produce Market Committee : समविचारी आघाडीच्या नेत्यांचा ‘वेट अँड वॉच’

शुक्रवारी (ता. २८) अकलूज बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे.
APMC Elections
APMC ElectionsAgrowon

Solapur District News : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती (Akluj Agriculture Produce Market Committee) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असताना, विरोधी गटातील समविचारी आघाडीच्या नेत्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत या गटाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. यामुळे तमाम जनतेचे लक्ष समविचारी आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

शुक्रवारी (ता. २८) अकलूज बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते- पाटील पॅनेलचे १८ व विरोधी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचे १८ असे एकूण ३६ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.

APMC Elections
Jalgaon Apmc Election : बाजार समितीत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणाचा डाव

निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून आयोजित प्रचार दौरे, बैठकांचा झंझावात सुरू आहे. यामध्ये एका बाजूला मार्केट कमिटीचा होत असलेला विकास व दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

असे असताना, मोहिते-पाटील यांचा पारंपरिक विरोधी गट मात्र या सर्व प्रक्रियेत आजपर्यंत अलिप्त राहिला असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग देशमुख, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य शंकरराव देशमुख, माजी डॉ. रामदास देशमुख, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर इंगळे- सरदेशमुख यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com