Water Shortage : कडेगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

गेल्या आठवडाभरापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तर उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी तालुक्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Sangli News : गेल्या आठवडाभरापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तर उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी तालुक्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तर विहिरींनी तळ गाठला असून अनेक विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. तर तालुक्यातील तलावांची पाण्याची पातळी निम्म्यापेक्षा कमी झाली आहे.

त्यामुळे तालुक्यात टंचाईचे (Water Shortage) सावट दिसू लागले आहे. तर जलसंपदा विभागाने टेंभू व ताकारी सिंचन विभागाने (Irrigation Department) आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावीत व आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

तालुक्यातील जुना चिखली रस्ता ते कडेपूर रस्ता परिसरात व अन्य भागात पाणी टंचाई भासू लागली आहे. या परिसरासह तालुक्यातील पूर्व भागात अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी कडक उन्हाळा असणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहेत.

दिवसेंदिवस तापमान वाढू लागले असून उन्हाच्या तीव्र झळांनी लोक हैराण होऊ लागले आहेत. पाण्याची पातळी खलावल्याने शेती पिकावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. पाण्याअभावी ऊस पिकासह अन्य बागायत पिके वाळू जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

Water Shortage
Water Shortage : पंचनद्यांचा वाडा कोरडाच

तालुक्यातील टेंभूच्या अखत्यारित असलेले कडेगाव, शाळगाव, हिंगणगाव, शिवाजीनगर, कोतीज, करांडेवाडी या सहा तलावांपैकी टेंभूचे अनुक्रमे शिवाजीनगर व हिंगणगाव हे दोन टप्पे असल्याने या दोन्ही तलावांत सध्या मुबलक पाणी आहे.

परंतु अन्य तालावांची पातळी खलावली गेली आहे. मागील महिन्यात या तलावांत काही प्रमाणात टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु वाढत्या उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर हे पाणी काही दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने सर्वच तलाव पाण्याने भरून घेऊन ओढे, नाले व ओघळीनाही पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तलावांतील पाणी क्षमता उपलब्ध साठा (दशलक्ष घन फुटांमध्ये)

कडेगाव - ८८.३८ (३६.८४)

शिवाजीनगर - ७७.४२ (७२.४६)

हिंगणगाव - २६६.९८ (१९६.१५)

शाळगाव - ८०.७४ (२५.१३)

कोतिज - ५१.७७ (१६.५०)

करांडेवाडी- ४८.५० (४७.५७)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com