Water Stock In Jalna : निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा ४३ टक्क्यांवर

परतूर परिसरासाठी हरित क्रांतीचे वरदान ठरलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचा धरणाचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Jalna News : परतूर परिसरासाठी हरित क्रांतीचे वरदान ठरलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचा धरणाचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे.

एप्रिल महिन्यात धरणाचा जिवंत पाणीसाठा (Water Storage) पूर्णपणे संपण्याची शक्यता निर्माण झाल्याने भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील परतूर, मंठा या दोन मोठ्या शहरासह परभणी जिल्ह्यातील सेलू आणि परिसरातील तब्बल १७३ छोट्या मोठ्या गावाची तहान भागवनाऱ्या निंन्न दुधना प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. रविवारी (ता. 9) सकाळी प्रकल्पात ४३.३८ टक्के पाणीसाठा होता.

अद्याप कडक उन्हाळ्याचे दोन महिने जायचे असल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात धरणातील जिवंत साठा संपू शकतो. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी याच तारखेला धरणात ७५ टक्के पाणीसाठा होता.

Water Stock
Water Stock In Buldana : बुलडाण्यातील जलाशयात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक

मुळात यावेळी नियामक आयोगाच्या आदेशाने धरणात १०० टक्के पाणीसाठा करण्याऐवजी ७५ टक्के पाणीसाठाकरण्याचे निश्चीत करण्यात आले. त्यानुसार जास्तीचे आलेले पाणी दूधना नदीपात्रात सोडून ७५ टक्केच पाणी कायम ठेवण्यात आले.

यामुळे परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. धरणात असलेला कमी पाणीसाठा पाहता पाणी उपसा पद्धतीत काहीसा बदल करणे अपेक्षीत होते. पण, शासनाच्या कोणत्याही विभागाने याबाबत उपाय योजना केल्या नाहीत.

सद्या प्रकल्पात ऐकून जलसाठा ४२३.६४० असून जिवंत पाणीसाठा २४२.२०० द.ल.घ.मी एवढा आहे.

धरणातील जिवंत पाणीसाठा जर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संपला तर मृत पाणी साठ्यातून पिण्याचा पाणीपुरवठा योजना तसेच शेतीला पाणी उपसा करावा लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com