भोरसह चार गावांतील पाणी देखभाल दुरुस्तीसाठी बंद

भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील पाइप आणि व्हॉल्व्हची त्रैवार्षिक दुरुस्ती केली जाते.
भोरसह चार गावांतील पाणी देखभाल दुरुस्तीसाठी बंद
Water SupplyAgrowon

पुणे : भाटघर धरणावरील वीज निर्मिती केंद्रातील (Power Generation) पाइप आणि व्हॉल्व्हची त्रैवार्षिक दुरुस्ती व देखभाल करण्यात येणार असल्यामुळे सोमवारी (ता. ६) ते १० जून या चार दिवसांच्या कालावधीमध्ये शहरासह चार ग्रामपंचायती आणि दोन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Water Supply) बंद राहणार असल्याची माहिती भाटघर धरण (Bhatghar Dam) प्रशासन विभागाने दिली.

भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील पाइप आणि व्हॉल्व्हची त्रैवार्षिक दुरुस्ती केली जाते. त्याप्रमाणे यावर्षीही दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे भोर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने ६ जूनपूर्वी पाणीसाठा करून ठेवावा किंवा योग्य नियोजन करावे, असे आवाहन संबंधित विभागाला केले आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने किवत, बारे बुद्रुक, बारे खुर्द, बसरापूर, म्हाळवडी, कर्नवडी या गावांचाही पाणीपुरवठा बंद राहणार आहेत.

मुख्याधिकारी हेमंत किरुळकर म्हणाले, की भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरण वीजनिर्मिती केंद्रातील पाइप व व्हॉल्व्हची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असला तरी भोर शहरासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com