
Water Shortage In Amravati : अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या केवळ दोन असताना आता मात्र सहा गावांना टँकद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ५४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
मागील वर्षी उत्तम पावसाळा झाल्याने यंदा पाणीटंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही, असा कयास होता, मात्र तो फोल ठरला आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून सहा गावांना टँकर लागले आहेत.
तर ५४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. सर्वाधिक टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून, वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
...ही आहेत टँकरची गावे
चिखलदरा : मोथा, आकी, घोंगडा, रायपूर, सोमवारखेडा.
चांदूररेल्वे : सावंगी मग्रापूर.
...या तालुक्यांमध्ये अधिग्रहित झाल्या विहिरी
अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चिखलदरा, तिवसा, चांदूररेल्वे, अचलपूर, वरूड, मोर्शी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.