Water Wastage : अमरावती धरणाच्या पाण्याची नासाडी

धरणातून डावा आणि उजवा हे दोन मुख्य कालवे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून संबंधित जलसंपदा विभाग आवर्तन सोडत असते.
Water Wastage
Water WastageAgrowon

Dhule News : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणाचे (Amaravati Dam) तिसरे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यालगत (Canal Water) उपचारीवरील चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी (Water Wastage) होत आहे.

कालव्याच्या आजूबाजूला पडीक शेतात गरज नसताना पाणी शिरले आहे. अनमोल किमतीच्या पाण्याचे कोणालाच सोयरसुतक नाही का, असा प्रश्‍न यानिमित्ताने शेतकऱ्यांना पडला आहे. संबंधित विभागाने अद्याप लक्ष घातले नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

धरणातून डावा आणि उजवा हे दोन मुख्य कालवे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून संबंधित जलसंपदा विभाग आवर्तन सोडत असते. अनेकदा कालवे सक्षमीकरणाबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

कालव्यावर बसविण्यात आलेल्या गेटवरील पाणी वळविण्याच्या दरवाजाच्या फळ्या तुटल्या आहेत. व्हॉल्व्हचे रॉड, व्हील नसल्याने योग्य पद्धतीने पाणी बंद करता येत नाही अथवा सोडता येत नाही. परिणामी, योग्य पद्धतीने सिंचन होत नाही.

Water Wastage
Chief Minister Eknath Shinde : वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याचे धोरण

लाभदायक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांनाही पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. यंदा केवळ ५० टक्के अल्प साठा झाला होता. आता या आवर्तनामुळे २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा खाली जाणार आहे. अजून तब्बल तीन महिने भर उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे जलसाठा तळ गाठेल की काय, याची चिंता शेतकरी वर्गाला आहे.

तीन दिवसांपासून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या कालव्याला कलवाडे गावाच्या पश्‍चिमेस पाण्याला उतार नाही. तेथे अस्तीरकरण केले होते.

तेही निकृष्ट झाल्याचे आजूबाजूला पाणी पाझरत आहे. लगतच डबके साचले आहे. त्यामुळे पाझरणाऱ्या ठिकाणी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. दरम्यान, अशी मागणी लगतच्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष वेधून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

धरणात कामकाज पाहण्यासाठी १६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फक्त एकच कालवा निरीक्षक असल्याने पाणी सोडले जाते, तेव्हा परीक्षण निरीक्षण केले जावे. आवर्तनाच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात संबंधित यंत्रणे कर्मचारी नेमाली पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

Water Wastage
Water Resource : कल्लोळामधील पाणी का थांबले?
आठवडाभरात पूर्ण कालव्याची पाहणी केली जाईल. भविष्यात पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. व्हील, रॉड जेथे नाहीत त्याची नोंद घेऊन उपलब्धतेसाठी वरिष्ठ पातळीवर मागणी केली जाईल. पाण्याची नासाडी थांबवू.
पीयूष पाटील, शाखा अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प, मालपूर, जि. धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com