Irrigation Management : नंदुरबारात उन्हाळी हंगामासाठी मिळणार पाणी

मंजुरी व पाणीपुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा, डाळी, भुईमूग व इतर उन्हाळी हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Agrowon

Nandurbar News : धुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या आधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प, ३३ लघु प्रकल्प आदी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी उन्हाळी हंगामासाठी १५ एप्रिल २०२३ पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना क्रमांक ७, ७ (अ), ७ (ब)चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल.

बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून, मुदतीनंतर आलेल्या अर्जांच्या मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरी, नामंजुरीचा विचार करण्यात येईल.

Agriculture Irrigation
Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपसा जलसिंचनाच्या पाण्याच्या दरात वाढ नाही

मंजुरी व पाणीपुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा, डाळी, भुईमूग व इतर उन्हाळी हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये.

थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.

पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहिरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसानभरपाई देता येणार नाही.

Agriculture Irrigation
Irrigation Scheme : उपसा सिंचन योजनेच्या कर्जमाफीबाबत बैठक घ्या

पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोचपावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील.

हस्तांतर झालेल्या पाणीवापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com