मोफत बियाणे उपक्रम राज्यात राबविण्याचा प्रयत्न करू:कृषिमंत्री दादा भुसे

या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १२७० महिला शेतकऱ्यांना ११५ क्विंटल सोयाबीन, ६२ क्विंटल भुईमूग आणि ९२ क्विंटल भात पिकाच्या बियाण्यांचे मोफत देण्यात येत आहे.
मोफत बियाणे उपक्रम राज्यात राबविण्याचा प्रयत्न करू:कृषिमंत्री दादा भुसे
Free SeedsAgrowon

कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेरणीसाठी मोफत बियाणे (Free Seeds) देण्यात येत आहेत. या उपक्रमाचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कौतुक केले. तसेच ‘‘राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

‘‘या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १२७० महिला शेतकऱ्यांना ११५ क्विंटल सोयाबीन, ६२ क्विंटल भुईमूग आणि ९२ क्विंटल भात (Paddy)पिकाच्या बियाण्यांचे मोफत देण्यात येत आहे. यापैकी भाताचे बियाणे वितरित केले आहे. तर भुईमूग (Groundnut) व सोयाबीन बियाण्याचे वितरण सुरू आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

रेखावार म्हणाले, ‘‘विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना साह्य करण्याबाबत त्यांनी बैठकीत सुचविले होते. या विचारातून कृषी विभागाने अशा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊ, असे सांगितले. त्यानुसार प्रयत्न सुरू केले. कोरोनामुळे पतीच्या निधनाने महिला शेतकऱ्यांवर संकट ओढवले. या संकटसमयी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या महिलांसोबत आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी कोल्हापूर बियाणे असोसिएशनने खूप सहकार्य केले. असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी यात पुढाकार घेतला आणि सर्व बियाणे विक्रेत्यांनाही त्यांनी आवाहन केले. या आवाहनामुळे १२७० हून अधिक महिलांना सोयाबीन, भुईमूग आणि भात पिकांचे बियाणे मोफत देण्यात येत आहे, असे रेखावार यांनी सांगितले. कृषी विभाग, महाबीज व जिल्हा नियोजन समितीद्वारे भाजीपाला बियाण्यांच्या मिनी किट्सचे देखील या महिलांना वाटप करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com