Maharashtra Farmer: महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू: मुख्यमंत्री

आमचे सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करेल. यासाठी विरोधकांचे सहकार्य लागेल. यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
Maharashtra Farmer
Maharashtra FarmerAgrowon

मुंबई : ‘राज्यात शेतकरी (Farmer) हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस केली जाते. त्याच्या जीवनात सुख समृद्धीचे क्षण यावेत यासाठी सरकार सर्वकाही करेल. आमचे सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त (Farmer suicides) महाराष्ट्र करेल. यासाठी विरोधकांचे सहकार्य लागेल. यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

विश्वास ठरावावरील अभिनंदन प्रस्तावावर आभार व्यक्त करताना शिंदे यांनी बंडखोरी आणि अन्य घडामोडींचा ऊहापोह केला. तसेच पुढील मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील व्हॅट (VAT) कमी करून सामान्य जनतेला दिलासा देऊ असेही सांगत त्यांनी हिरकणीवाडीसाठी २१ कोटींच्या निधीची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही शिवसेनेतून (Shivsena) फुटल्याने परत निवडून येणार नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, येत्या निवडणुकीत फडणवीस आणि मी दोघे मिळून २०० जागा निवडून आणू. मी कालही शिवसेनेत होतो आणि आजही शिवसेनेत आहे.

Maharashtra Farmer
Farmers Issue: मुख्यमंत्री महोदय, आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घ्या : बाळासाहेब थोरात

‘इंधनावरील दर कमी करू’

जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही व्हॅट (VAT) कमी केला नाही परंतु, राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल, असे शिंदे म्हणाले.

Maharashtra Farmer
Maharashtra Political Crisis : आम्ही गद्दार नाही, शिंदेंचे प्रथमच प्रत्युत्तर

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे आणि माझे चांगले जुळते. आम्हाला बंडखोर म्हटले गेले, त्यानंतर डुक्कर काय, प्रेत काय आणि काय काय बोललं गेले. तरीही आम्ही शांत राहिलो. माझ्याकडे आमदार येऊन रडायचे. माझ्याकडे लोक त्यांची व्यथा सांगायची. माझ्याकडून जेवढी मदत होत होती तेवढी करत होतो. सगळ्यांना वाटत होतं की भाजपचा मुख्यमंत्री होईल. मात्र तसं झालं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला मुख्यमंत्री केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com