
भारतामध्ये इतर कोणत्याही राज्यांच्या तुलनेत भारी काळ्या जमिनीचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रा मध्ये आहे. भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी क्षारपड व पाणथळ (Salty Soil) होऊन नापीक (Barren Land) होत आहेत. अशा जमिनीची सुधारणा करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जमिनी पानथळ होण्याची कारणे
भारी काळ्या जमिनीची कमी निचरा क्षमता.
भूपृष्ठापासून कमी खोलीवर असणारे अभेद्य थर.
पारंपारिक सिंचनाद्वारे पिकांसाठी पाण्याचा अमर्याद वापर.
धरणे तलाव कॅनॉल यामधून होणारी पाण्याची गळती.
पावसापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त.
विस्कटलेली नैसर्गिक निचरा पद्धत.
पूरपरिस्थिती
योग्य त्या पीक फेरपालटीचा आभाव
सेंद्रिय पदार्थांचा कमी वापर
मचुळ पाण्याचा शेतीसाठी वापर
निचरा पद्धतीचे फायदे
- पिकाच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार होते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते.
- पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन पीक जोमदार वाढते. या पद्धतीने जमिनीची संरचना सुधारून पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.
- प्रमाणशिर मशागत करण्यास सोयीस्कर जाते. जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते.
- जमिनीच्या पृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमीन लागवडीसाठी योग्य होते.
- वाफसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बिजांकुरण वाढवण्यास मदत होते.
स्त्रोत ः कृषिदर्शनी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.