Crop Protection : ट्रायकोडर्मा वापरण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

मातीतून येणाऱ्या रोगांसंदर्भात एकात्मिक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी महत्त्वाची ठरते.
 Crop Protection
Crop ProtectionAgrowon

सामान्यतः बुरशी हा शब्द येताच पिकावरील रोगांचे व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी आहेत. त्यातील काही बुरशी पिकांसाठी (Fungal) रोगकारक असतात. तर काही बुरशी पिकांचे रोगांपासून संरक्षण करतात. त्यांना मित्र बुरशी असे म्हणतात. त्यातील ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत म्हणजेच रायझोस्फियर (Rhyzosphere) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. म्हणून मातीतून येणाऱ्या रोगांसंदर्भात एकात्मिक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी महत्त्वाची ठरते. 

 Crop Protection
खवा बनवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ?

पिकांचे विविध रोगापासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा चा पिकामध्ये विविध पद्धतीने वापर केला जातो. ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे. 

१) बीजप्रक्रिया 

बीज प्रक्रियेकरिता ट्रायकोडर्मा १० ग्रॅम किंवा १० मिलि प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बियाणास वापरावे. गुळाचे पाणी करून त्यात ट्रायकोडर्मा मिसळावा. त्याचे द्रावण १ किलो बियाण्यांवर शिंपडावे. नंतर सर्व बियाणे एकत्र करून हलक्या हाताने चोळावे. नंतर ते बियाणे सावलीमध्ये प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ठेवावे. बियाणे काही वेळाने वाळल्यावर पेरणीसाठी वापरावे.  

 Crop Protection
Rabi Intercropping : रब्बी हंगामासाठी कोणत्या आंतरपीक पद्धती फायदेशीर?

२) कंद प्रक्रिया  

ट्रायकोडर्मा २०० ग्रॅम किंवा मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे. लागवडीसाठी निवडलेले कंद या द्रावणात ३० ते ६० मिनिटे बुडवून ठेवावेत. त्यानंतर ते बाहेर काढून सावलीमध्ये वाळवावेत. नंतर लागवडीसाठी वापरावेत. तसेच कंद प्रक्रियेसाठी ‘बायोप्रायमिंग’या पद्धतीचा वापर करू शकतो. या पद्धतीमध्ये तयार केलेल्या द्रावणामध्ये कंद रात्रभर भिजण्यास ठेवून द्यावेत.  दुसऱ्या दिवशी भिजलेल्या कंदाचा लागवडीस वापरावेत. या पद्धतीमुळे कंदाला लवकर फुटवा येण्यास मदत मिळते. कंदांचा बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो.  

३) मातीमध्ये मिसळणे 

ट्रायकोडर्मा भुकटी ५ किलो प्रति २५० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी शेतामध्ये पेरणीपूर्वी मशागतीच्या वेळी टाकावी. जमिनीतून पसरणाऱ्या रोगकारक बुरशींना आळा बसतो.  

४) फवारणी 

फवारणीकरिता ट्रायकोडर्मा १० मि.लि. किंवा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पिकांवर फवारणी करता येते. 

५) आळवणी 

ट्रायकोडर्मा १० मिलि किंवा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडाच्या मुळांजवळ पारंपरिक पद्धतीने किंवा फवारणी पंपाचे नोझल काढून आळवणी करता येते. ठिबकद्वारेही सोडता येते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com