Organic Farming : सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत?

विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

अलीकडच्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (New Technology) वापर वाढला. याशिवाय रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापरही वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ जरी होत असली तरी मिळणारी उत्पादने ही रसायनयुक्त मिळत आहेत. त्यामुळे मानवामध्ये विविध आजारांत वाढ झालेली आहे. त्यामुळे विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. जी लहान शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आणि उपयुक्त आहे.  सेंद्रिय शेतीत उपलब्ध असलेल्या आणि कमी निविष्ठांमध्ये शेती करता येते. सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये आणि आवश्यक घटक काय आहेत याबाबत माहिती घेऊया. 

Organic Farming
Goat Farming : कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये माहीत आहेत का ?

१) मृदासंवर्धन - रसायनांचा वापर थांबविणे,  पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, आंतरपीक आणि बहु-पीक पद्धतीचा अवलंब करणे, जास्त नांगरणी न करणे. जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी जमिन सतत हिरव्‍या किंवा ओल्‍या गवताने आच्छादीत राहील यासाठी प्रयत्न करणे इ. बाबी मृदासंवर्धनासाठी आवश्यक आहेत. 

२) पावसाच्या पाण्याचे संवर्धन - पाझर तलाव, शेततळे खोदने, उताराच्या जमिनीला बांध घालणे. बांधावर कमी उंचीचे वृक्षारोपण करणे.

३) निविष्ठांची निर्मिती - पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठांची स्वतः निर्मिती करणे यामध्ये घरचेच बियाणे वापरणे, कंपोस्‍ट, व्हर्मीकंपोस्‍ट, व्हर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पती अर्क तयार करणे इ. बाबींचा समावेश होतो.  

४) जैवविविधता - पक्षीथांबे उभारणे, मधमाशा, तसेच उपयुक्त किटकांचे संवर्धन करुन शेतातील जैवविविधता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे.  

५) पशुपालन - जनावरे ही सेंद्रिय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत. जनावरांपासून दुधाव्यतिरिक्त शेण आणि मूत्र मिळते. जे सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. 

६) सौरउर्जेचा वापर - जास्तीत जास्त सौरउर्जेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर करणे. बायोगॅस आणि बैलांद्वारे चालविण्‍यात येणारे पंप, जनरेटर इं. यंत्राचा वापर करणे.   

------------

स्त्रोत ः  सब्जियों और फलों की जैविक खेती 

- डॉ. पूनम कश्यप, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com