Budget 2023 Agriculture : यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळाले?

यंदाच्या अर्थसंकल्पांत शेती कर्जासाठी २० लाख कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. भरडधान्य उत्पादनावर विशेष भर देण्यात आला आहे.
Budget
Budget Agrowon

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी बुधवारी (ता.१) केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) लोकसभेत मांडला. कृषी क्षेत्राच्या (Agriculture Sector) विकासासाठी विविध योजनांची घोषणाही या अर्थसंकल्पातून करण्यात आली.

अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आल्याचे सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला काय मिळाले ?

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय ?

- शेती व पूरक उद्योगांसाठी ८४ हजार २१४ कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित.

- शेती कर्जाचे उद्दीष्ट २० लाख कोटी रूपये. पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यशेतीवर विशेष फोकस.

- भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना.

- हैदराबादमधील भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला सेन्टर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता.

- ग्रामीण भागातील स्टार्टअपला चालना देण्यासाठी अॅग्रिकल्चर अॅक्सिलरेशन फंड.

- डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार. पीक नियोजन, पिककर्ज, विमा, मार्केट इन्टेलिजन्ल, स्टार्टअप, शेती तंत्रज्ञान उद्योगांसाठी त्याचा फायदा होणार.

- फळ, भाजीपाला पिकांचे रोगमुक्त, दर्जेदार रोपे उफलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रोत्साहन.

- लांब धाग्याच्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी क्लस्टर आणि मूल्यसाखळी विकसित करणार.

Budget
Budget 2023 Artificial Intelligence: अर्थसंकल्पात शेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर भर

- नाशवंत शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी साठवणूक सुविधा वाढवणार.

- नाशवंत शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी देशात शीतगृह उभारणार

-देशात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ३ केंद्र उभारण्यात येणार आहेत.

-कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करण्यात येणार

देशात कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनासाठी ३ केंद्र उभारण्यात येणार.

- कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरांसाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न.

- मागील आठ वर्षात शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आल्याचा दावा.

- देशातील धान्य उत्पादन मागील ८ वर्षात २५० दशलक्ष टनांवरून ३१० दशलक्ष टनांवर गेल्याचाही दावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com