Biofortified Varieties : बायो-फोर्टिफाइड जाती म्हणजे काय ?

बदलते वातावरण, कीड - रोगाचा प्रादुर्भाव तसच वाढती अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन विविध पिकांचे नविन वाण विकसीत करण्याची गरज निर्माण झाली.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

बदलते वातावरण, कीड - रोगाचा प्रादुर्भाव तसच वाढती अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन विविध पिकांचे नविन वाण विकसीत करण्याची गरज निर्माण झाली.

त्याच वेळी उपलब्ध असलेल्या पिकांच्या वाणांच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. त्यामुळे पिकांच्या नवीन वाणांवर संशोधन होऊ लागले.

त्यामुळे पौष्टिक गुणवत्ता म्हणजेच प्रथिने,लोह, आणि जस्त इ.च्या वाढीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही.

दुसऱ्या बाजुला बहुतेक पिकांच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती पौष्टिक गुणवत्तेत कमकुवत आहेत किंवा त्यांची पौष्टिक स्थिती आवश्यक स्तरापेक्षा कमी आहे.

संतुलित पोषण आहाराच्या सेवनामुळे कुपोषण ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे.

कुपोषण दूर करण्यासाठी अन्नधान्याच्या  बायो-फोर्टिफाइड जाती तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि कमीत कमी खर्चिक मार्ग आहे. 

Wheat Production
Rice varieties: फॉस्फरसी गरज कमी असणाऱ्या भाताच्या जाती विकसित

बायो-फोर्टिफाइड जाती म्हणजे काय ?

धान्यपिकांमधील पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. अशा वाणांना बायोफॉर्टीफाईड म्हणजे जैवसंपृक्त वाण म्हटले जाते.

बाहेरून गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय ठरतात.      

भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती केली आहे. या जातींमध्ये अन्नघटकांचे चांगले प्रमाण आहे. भाताच्या जातीही विकसीत झाल्याआहेत.   त्यामुळे मानवी आहारात पोषक धान्याचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्याप्रती जागरुक असणाऱ्या ग्राहकांनाही पोषक घटकांनी युक्त पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com