Indian Agriculture : शेती कामांसाठी स्वस्त काय...मजूर की यंत्र

दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वस्त हे निवडणे कठीण होते. पण खेडकर कुटुंबाने मशिनने (यंत्राने) तूर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वेळ आणि खर्चाचा बेरीज-वजाबाकीचा हिशेब करून शेवटी निर्णय घेतला.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यात भास्कर खेडकर (लिंबे-नांदूर, ता. शेवगाव, जि. नगर) यांच्याशी तूर पिकावर (Tur Crop) सविस्तर रूपाने चर्चा झाली होती. त्यांची पाच एकर शेती आहे.

त्यांच्या कुटुंबाने चालू वर्षाच्या खरीप हंगामात (Kharif Season) सर्व पाच एकर शेतीत तूर पेरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तूर पेरणी केली. मात्र अतिवृष्टीने एक एकर तूर वाया गेली.

उरलेल्या चार एकर क्षेत्रावर असलेली तूर (Tur) परवा काढली. खेडकर यांना प्रश्‍न निर्माण झाला होता, की तूर कशी काढायची? त्यांच्याकडे तूर काढण्यासाठी मजूर आणि यंत्र असे दोन्ही पर्याय होते.

या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वस्त हे निवडणे कठीण होते. पण खेडकर कुटुंबाने मशिनने (यंत्राने) तूर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वेळ आणि खर्चाचा बेरीज-वजाबाकीचा हिशेब करून शेवटी निर्णय घेतला.

मजुरांकडून तूर काढण्यासाठी येणारा खर्च :

मजुरांनी तूर काढण्यासाठी पाच हजार रुपये एकर प्रमाणे पैसे मागितले होते. अर्थात, चार एकर क्षेत्रावरील तूर काढणीसाठी २० हजार रुपये आणि ५०० रुपये प्रतिक्विंटल मळणीसाठी द्यावे लागणार होते. खेडकर यांना एकूण २६ क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले.

त्याचे ५०० × २६ = १३,००० + मजुरी २०,००० रुपये = ३३,००० हजार रुपये असा एकूण खर्च येणार होता. याशिवाय मजुराने जर तूर काढली तर वेळ आणि श्रम जास्त लागणार होते; तसेच तूर भरण्यासाठी पोत्याचा खर्च वाढणार होता.

तूर काढणी यंत्राने काढली. यंत्राने तूर काढण्यासाठी प्रतिएकर ३००० रुपये प्रमाणे खेडकर यांना पैसे द्यावे लागले... ४ × ३००० = १२,००० रुपये प्रत्यक्ष काढणी आणि मळणी असा खर्च आला आहे.

सद्यःस्थितीत तुरीला प्रतिक्विंटल ७००० रुपये भाव चालू आहे. सर्वसाधारणपणे यंत्राने तूर काढणी केली, तर एक क्विंटलमागे १० ते १२ किलो (१० ते १२ टक्के) नुकसान होते, असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.

Indian Agriculture
Tur Rate : आज, १७ जानेवारीला तुरीला कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव मिळाला?

त्यामुळे प्रतिक्विंटलला ७०० ते ८४० रुपये तुरीची गळती झाली असे गृहीत धरले. तर चार एकरांवरील एकूण २६ क्विंटल × ७०० (१० टक्के गळती) = १८,२०० रुपयांच्या तुरीची गळती अप्रत्यक्ष झाली आहे.

अर्थात, यंत्राने करावयाचे १२००० +१८२०० गळतीचे असे ३०२०० रुपये खर्च प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेला आहे. शिवाय यंत्राने तूर केल्याने बांधाच्या कडेला राहिलेली तूर काढण्यासाठी दोन-चार मजूर एक-दोन दिवस लागणार आहेत.

दुसरे, शेतीचा तुडवा झालेला आहे. त्यामुळे नांगरट करावी लागेल. नांगरट दोन हजार रुपये एकरने चालू आहे. त्याचा ८००० रुपये खर्च वाढणार आहे. शिवाय तुरीचे कुटार (चारा) जनावरांना मिळणार नाही. तो शेतातच पडणार आहे.

सारांशरूपाने मजुरांकडून तूर केली, तर ३३००० रुपये लागणार होते. शिवाय वेळ आणि श्रम हे दोन्ही घटक जास्तीचे तर यंत्राने तूर केली असता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ३०२०० रुपये खर्च लागलेला आहे.

मात्र तूर झटपट झाली आहे. त्यामुळे मजूर तुटवड्यावर पर्याय म्हणून जरी यंत्राचा वापर करावयाचा ठरवले, तरी येणारा खर्च कमी-जास्त प्रमाणात सारखाच असल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com