आपला जगण्याचा आरसा कोणता?

साहित्याला ‘जगण्याचा आरसा’ असं म्हटलं जातं. पण बदललेल्या काळात साहित्याला ‘जगण्याचा बहिर्गोल आरसा’ असं म्हणता येईल. बहिर्गोल आरशात आपल्याला खरी प्रतिमा दिसत नाही.
मशागत लेख
मशागत लेख Agrowon

साहित्याला ‘जगण्याचा आरसा’ असं म्हटलं जातं. पण बदललेल्या काळात साहित्याला ‘जगण्याचा बहिर्गोल आरसा’ असं म्हणता येईल. बहिर्गोल आरशात आपल्याला खरी प्रतिमा दिसत नाही. मोटारसायकल किंवा चारचाकी गाड्यांचे उदाहरण घ्या. या गाड्यांना हे बहिर्गोल आरसे असतात. ते आरसे आपल्याला लांबवर असलेलं वाहन जवळ दाखवतात. आपल्या आयुष्यात तरी वेगळं काय होतंय? आपण हे असेच नात्यांचे बहिर्गोल आरसे जवळ कवटाळून बसलो आहोत.

मशागत लेख
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

जे खरे तर आपल्यापासून दूर आहेत, पण आपल्याला असं वाटतंय, की ते आपल्या जवळ आहे. मग या नात्यांचं खरं रूप दाखवणार तरी कोण? जसा गाडीचा ड्रायव्हर शंभर टक्के त्या आरशातील प्रतिमेवर अवलंबून असत नाही. तो ड्रायव्हर वेळोवेळी आपले डोके गाडीच्या बाहेर काढतो व मागच्या गाड्यांचा अंदाज घेतो. म्हणजेच तो ड्रायव्हर खरा अंदाज घेत असतो. तसंच आपणही रोजचं आयुष्य जगत असताना आपण आपले समजत असलेल्या लोकांमधून बाहेर पडून थोडं बाहेर डोकावलं पाहिजे.

मशागत लेख
कृषी सहायकांची आंदोलनाची हाक

अन्यथा आपल्या समोरच्या नात्यांच्या बहिर्गोल आरशातील प्रतिमेलाच आपण खरं मानून बसू. आपलं जगणं, आपलं इतर नात्यांना वेळ देणं झालं पाहिजे. इतर लोकांकडून आपली जी अपेक्षा आहे ती घरातल्या आरशाप्रमाणे असली पाहिजे. म्हणजेच थेट प्रतिमा दिसली पाहिजे. अगदी सरळ!

‘जरा’ आणि ‘मरण’ हे काय कुणालाही चुकलेलं नाही. प्रश्‍न असा आहे की आपण कसं जगलो? कसं जगायचंय आपल्याला? आपल्या जगण्याचं प्रयोजन काय? का जगत आहोत आपण? या प्रश्नांचा शोध घ्यायला हवा आपण. कवी मंगेश पाडगावकर आपल्या ‘सांगा कसं जगायचं?’ या कवितेत फार सुंदररीत्या या प्रश्‍नांची उत्तरे देतात. ते म्हणतात की,

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत की गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

सरला आहे म्हणायचं

की भरला आहे म्हणायचं

तुम्हीच ठरवा!

त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपला जगण्याचा आरसा कसा असायला हवा तो. कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com