Women Empowerment : भटक्या पशुपालक महिलांचे प्रश्न कधी सुटणार ?

रस्त्यावर दोरावर चालून डोंबाऱ्याचा (Dobarin) खेळ करणारी डोंबारीण असो दाराघरात गुबुगुबू वाजवत पोट भरणारी कडकलक्ष्मी (Kadaklakshmi) असो वा फडावर नाचून आपला उदरनिर्वाह करणारी कोल्हाटीण असो सगळ्या बायांचं दुःख सारखंच.
Women In Rural
Women In RuralAgrowon

रस्त्यावर दोरावर चालून डोंबाऱ्याचा (Dobarin) खेळ करणारी डोंबारीण असो दाराघरात गुबुगुबू वाजवत पोट भरणारी कडकलक्ष्मी (Kadaklakshmi) असो वा फडावर नाचून आपला उदरनिर्वाह करणारी कोल्हाटीण असो सगळ्या बायांचं दुःख सारखंच. भटक्या जातीत जन्माला येणं कमी होतं कि काय म्हणून बाईच्या (Women Life) जन्माची परवड सुद्धा त्यांच्याच नशिबी असते.

डोंबारीण, कडकलक्ष्मी, कोल्हाटीण यांच्यासारख्याच इतर अनेक भटक्या जातीच्या महिला आहेत. यात गाढवाच्या पाठीवरून संसाराचं ओझ वाहणारी कैकाडीन, रस्त्याच्या कडेला घाम गाळत दगड फोडणारी बेलदारीण, जनावरांच्या मागं पाळत ठेवून असणारी गवळीण. अशा कित्येक बाया काट्यावरचे आयुष्य जगतायत.

पितृसत्ताक पद्धतीच्या प्रभावाखाली पिचलेल्या या बायांना ऊ का चू करायचं स्वातंत्र्य आजही नाही; पण लक्षात कोण घेतो? शहर असो की ग्रामीण भाग आपल्याला अशी दृश्य कायम नजरेस पडतात. हे बघून आपण थोडं हळहळतो पण नंतर चार पावलं चालली कि विसरूनही जातो. आता यासाठी कोणत्या संस्थेने काही करावं तर त्यातही त्यांना सक्रिय सहभाग घेता येत नाही.

तर महिला किसान अधिकार मंचाने विदर्भातील महिला शेतकर्‍यांसंबंधी एक चर्चासत्र आयोजित केले होते. भटके पशुपालक आणि महिला यांबद्दल चर्चा आणि महिलांना बोलत करण्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर दिली होती.

या आधी बर्‍याच विषयांवर महिला शेतकर्‍यांनी आपापले अनुभव सांगितले. पुढच्या सत्रात फक्त 4 महिला आणि बाकी सगळे पुरुष. रब्बारी, भारवाड, गवळी आणि पारधी समाजातील प्रतिनिधी होते. रब्बारी आणि भरवाड यांच्यातील गुजराती मराठी हिंदी संभाषण करायला पुरुषच होते, कारण महिला येउच शकत नाहीत अस ते म्हणाले. गवळी बायका पण संध्याकाळी लवकर जायच्या घाईत होत्या कारण काय तर म्हशी घरी आल्या असतील आणि चारा पाणी करावं लागेल

भटक्या पशुपालक महिलांच्या दिनचर्येचा, त्यांच्या कॅपॅसिटिचा आणि अडचणींचा विचार आणि त्यासंबंधी धोरणात्मक प्रक्रिया होणे ही काळाची गरज आहे. दिनचर्या बघितली तर ढेबरिया रब्बारी महिला या सकाळी 4 ला उठतात मेंढ्यांची कोकरं वाडा यांची सोय लावली की स्वतःच्या परिवाराची सोय, पाणी आणणे, स्वयंपाक करणे मेंढ्या चरायला जाण्याआधी सगळ्या परिवाराची न्याहारी करणे इतकी कामे या महिला 3 तासात करतात कारण 7 वाजता मेंढ्या चरायला निघायला हव्या कारण आपण दुसर्‍याच्या शेतात राहतो. 

दुसरं उदाहरण म्हणजे डहाणूला वास्त्यव्यात असलेले ख़ताळ नावाचे धनगर त्यांच्या डेर्‍यावर पण 75 टक्के काम हे महिलाच करताना दिसतील घोडे, कुत्रे मेंढ्यांची कोकरे यांच्यापासून घरचे लहान मूल यांच्या सगळ्यांची काळजी आणि यांची जोपासना करण्याचे निर्णय आणि नियोजन हे महिला करताना दिसतात.

ढोबळ आकडे हे सांगतात की भारतात भटक्या पशुपालकांचे एकंदर आर्थिक योगदान हे 35 हजार कोटी आहे आणि या आर्थिक उलाढालेच प्लानिंग हे 75% महिला करताना दिसतात आणि अशा काही महिला आहेत आणि त्यांच्या काही अडचणी असतील याचा आपण विचार देखील करत नाही आणि त्यातून कठुआ सारख्या घटना घडतात. 

एकंदर भटक्या पशुपालन करणार्‍या समाजात स्रिया या अनेक धोक्यांना आणि अडचणींच्या थेट साक्षीदार आहेत तर कधी त्या त्यामुळे बळी पडणार्‍या घटक आहेत. शिक्षण, आरोग्य आणि निर्णय घेण्याची क्षमता या सर्व माणसाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत.

या समुदायासाठी भटकंती हाच निवारा आहे. या सर्व गरजा आणि त्याबाबत असलेलं अज्ञान आणि नसलेल्या सोयी हा या सर्व परिस्थिती मागचा मह्त्त्वाचा बिंदू त्यावर काम करणे म्हणजे या समुदायाला जगणे सुकर करणे होईल आणि हे काम भारतात अनेक संस्था आणि महिलाच करताना दिसतात. 

गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात बायकांसोबत काम करणार्‍या इल्सा कुलर रोलेफ्सन या नेहमी एक वाक्य म्हणतात Women are the invisible guardians of animal diversity, स्रिया या अदृष्यपणे पशुपालक आहेत, त्या कायम अदृष्य असाव्यात का? कायम अडचणीत असाव्यात का? परत ढेबरिया रबारी असतील किंवा धनगर असतील, घोड्यावर वा उंटावर मेंढ्यांच्या कोकरांसोबत स्वतःची पोरं लादून सगळा लवाजमा बांधणे आणि सांभाळ करणे हे स्रियाच करताहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com