College Friends
College FriendsAgrowon

ती कुठे काय करते?

परवा खूप वर्षांनी कॉलेजची मैत्रीण भेटली. मग आम्ही बराच वेळ कॉलेजच्या आठवणीमध्ये रमलो. गप्पा मारता मारता तिने विचारले, ‘‘तू काय करतेस?’’ मी म्हणाले, ‘‘मी शिक्षिका आहे.’’

परवा खूप वर्षांनी कॉलेजची मैत्रीण (College Friend) भेटली. मग आम्ही बराच वेळ कॉलेजच्या आठवणीमध्ये रमलो. गप्पा मारता मारता तिने विचारले, ‘‘तू काय करतेस?’’ मी म्हणाले, ‘‘मी शिक्षिका (Teacher) आहे.’’ तिला विचारल्यावर ती उदासपणे म्हणाली, ‘‘मी कुठे काय करते? मी गृहिणीच तर आहे. फक्त सगळ्यांचं करायचं अन् वरून ऐकून घ्यायचं, घरकाम तर कुणीही करेल पैसे कमवायला अक्कल लागते!’’ खरंच, नोकरीच करायला हवी गं. तिची अशी नाराजी बघून फार वाईट वाटलं.
मुळात ही खंत तिची एकटीची नाही. अनेक घरांमध्ये हे चित्र बघायला मिळते. अजून सुद्धा मुली कितीही शिकल्या तरी त्यांनी आव्हानात्मक नोकरी व्यवसाय निवडू नये. किंवा मुलं झाल्यावर अथवा काही घरगुती अडचण असेल तर तिने नोकरी सोडली तर फारसं काही बिघडत नाही, अशी मानसिकता आहे. त्यामुळे ती सुद्धा कुटुंबासाठी गृहिणी होणं मान्य करते. आणि एकदा तिने चार भिंतीची चौकट मान्य केली की त्यात ती इतकी अडकते की तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. बाहेरच्या जगाबद्दल ती अनभिज्ञ होते. कालांतराने हीच शिकलेली स्त्री कुटुंबीयांना व मुलांना मागासलेली वाटू लागते. शिवाय, अर्थार्जन करत नसल्याने सतत कुणावर तरी अवलंबून राहिल्याने हिणवली जाते.

College Friends
कांदा-कैरी चटणी

काही वर्षांपूर्वी श्रीदेवीची प्रमुख भूमिका असणारा ‘इंग्लिश विंग्लिश’ (English- Wiglish Movies) हा चित्रपट आला होता. त्यात तिने एका गृहिणीची भूमिका केली होती, जिला इंग्रजी येत नाही. तिचं राहणीमान, वागणं बोलणं साध्या गृहिणीसारखं असतं. उच्चभ्रू वर्गात वावरताना तिच्या मुलीला व नवऱ्याला कमीपणा वाटत असतो. त्यामुळे ती व्यथित होऊन जिद्दीने इंग्रजी शिकते. शेवटच्या प्रसंगात इंग्रजीत बोलताना (English Speaking) ती म्हणते, ‘‘कुटुंब ही एकच जागा अशी आहे, जी तुम्हाला कमीपणाची भावना येऊ देत नाही, तुमच्या दोषांवर हसत नाही व जिथे तुम्हाला प्रेम आणि आदर मिळतो.’’ ते बघताना असे अनेक कुटुंब डोळ्यांसमोर तरळून गेले जिथे स्त्रीला खिजगणतीतही धरत नाहीत.
खरं तर, प्रत्येक घरातली स्त्री आपल्या घरातली सर्व कामे केवळ कर्तव्य अथवा जबाबदारी म्हणून न करता आई, (Mother) बायको,(Wife) बहीण, (Sister) सून, सासू, आजी, वहिनी अशी असंख्य नात्यांच्या ओढीने करीत असते. परंतु आपण कधी विचार करतो का, की आपल्यावरील प्रेमापोटी, काळजीपोटी केल्या जाणाऱ्या कामाची आपल्याला काही किंमत असते का? आणि जर ती करत असलेली सगळी कामे नोकर ठेवून करून घ्यायची ठरवली तर? आपलं सगळं आर्थिक नियोजन कोलमडेल. शिवाय तिच्या इतकं आपलेपणाने, मायेनं हे सगळं कोणी करेल याची कोणी शाश्वती देऊ शकेल?

अजूनही आपल्याकडे बहुसंख्य कुटुंबांमध्ये स्त्री कमवत नाही म्हणून तिला कमी लेखले जाते. परंतु त्यावरून तिला दुय्यम दर्जा देणारे कुटुंबीय हे कसे काय विसरतात की पैसे वाचवणं म्हणजे देखील पैसे कमावणेच असते म्हणून! घरखर्चाला म्हणून मिळालेल्या पैशातून जी काही बचत ती करते त्यातून ती अप्रत्यक्षपणे पैसा (Money) कमवतच असते, हे सत्य नाकारून कसं चालेल? उलट आपल्यापैकी बहुसंख्य पुरुषांचा असा अनुभव असेल की कधी काळी आर्थिक अडचणीत असताना घरातल्या गृहिणीने बचत केलेले पैसेच आर्थिक संकटातून बाहेर निघण्यास कामी आले आहेत म्हणून!

College Friends
कापूस, सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी मूल्यसाखळी धोरण

अशी एकंदरीतच गृहिणीबाबत अनास्था असताना स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणाऱ्या एका महिलेचे, समाजातील महिला व मुलींनी कसे वागावे यावरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मला मोठी गंमत वाटली. कारण प्रत्येक घर वेगळं, तिथले प्रश्‍न वेगळे त्याची उत्तरंही वेगळी. मग अशी सरसकट नियमावली मांडणं चुकीचं नाही का? मुळात आपलं घर आणि कुटुंब यांचं मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक (Social) स्वास्थ्य सुदृढ राहावं याची जबाबदारी घरातल्या प्रत्येक घटकावर असते. पण त्या सर्व जबाबदाऱ्या घरातली स्त्री न कंटाळता पार पाडत असते. कारण निसर्गाने स्त्रियांमधे मातृत्वाची जबाबदारी देताना काही विशिष्ट गुणधर्म सुद्धा स्थापित केलेले असतात. त्यामुळे कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या ती स्वतःहून स्वीकारते व आनंदाने पार पाडते. त्या बदल्यात तिला हवे असतात फक्त प्रेमाचे चार शब्द अन् थोडंसं कौतुक!कारण त्यातून मिळणारं समाधान तिला कुटुंबासाठी लढण्याचं बळ देत असतं. म्हणूनच घराच्या या प्रमुख आधारस्तंभाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता आपण बदलायला हवा आहे. चार भिंतींना घर (Home) बनवणारी ती म्हणजे संपूर्ण कुटुंब व्यवस्थेचा श्वास आहे, याची जाणीव ठेवून ती कुठे काय करते या भावनेपासून तिच्याशिवाय घराला घरपण नाही अशा जाणिवेपर्यंत आपण पोहोचलो तर केवळ देव्हाऱ्यातच नाही तर घराघरांत सुद्धा अन्नपूर्णा, दुर्गा, अन् लक्ष्मी सौख्याने नांदल्या शिवाय राहणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com