अनिश्चित पाऊसमानात कोणती पिके घ्यावीत?

पावसाचं चाल-चरित्र कसं राहतं, त्यानुसार शेतकऱ्यांना पिक नियोजन करावं लागतं.
Crop Pattern
Crop PatternAgrowon

राज्यात सध्या काही ठिकाणी अति पाऊस (Rain) सुरू आहे, तर काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून पावसात टोकाचे चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे पाऊस लांबणे, थोड्या काळात जास्त पाऊस पडणे, पावसात खंड पडणे, संततधार, अतिवृष्टी अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. पावसाचं चाल-चरित्र कसं राहतं, त्यानुसार शेतकऱ्यांना पिक नियोजन (Crop Pattern) करावं लागतं.

Crop Pattern
शेतीमध्ये बदलली पीक पद्धती

अनिश्चित पाऊसमानात पर्यायी पीक नियोजन कसं करावं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. त्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील शिफारशी केल्या आहेतः

- पेरणी योग्य पावसाच्या आगमन कालावधीमध्ये म्हणजे १५ जून ते ३० जून तसेच १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत सर्व खरीप पिके घेता येतात.

- ८ जुलै ते १५ जुलै या कालवधीत कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ आणि सूर्यफूल ही पीके घ्यावीत तर, भुईमूग, मूग आणि उडीद ही पीके घेऊ नयेत.

- १६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सूर्यफूल, संकरित ज्वारी, सोयाबीन अधिक तुर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३), एरंडी, कारळ आणि तीळ, एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर ही पीके घ्यावीत. कापूस, संकरित ज्वारी भुईमूग ही पिके घेऊ नयेत.

- १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी आणि तीळ, एरंडी अधिक धने (१:१) एरंडी अधिक तूर, एरंडी आणि धने अपरिहार्य परिस्थितीत घ्यावे. कापूस संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेऊ नयेत.

Crop Pattern
Soybean : पामतेल नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम होणार?

- १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी अधिक धने, एरंडी अधीक तूर आणि धने ही पीके घ्यावीत. कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, रागी आणि तीळ ही पिके घेऊ नयेत.

वरील शिफारशींमध्ये सांगितलेल्या कालावधीत कमी-अधिक ४ ते ५ दिवसांचा फरक होऊ शकतो. आपत्कालीन पीक नियोजनात शक्यतो आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com