Fertilizer Subsidy : सरकार खतांवर अनुदान नेमकं कुणासाठी देतं?; शेतकऱ्यांसाठी की खत कंपन्यांसाठी?

Maharashtra Krishi Yojana : रासायनिक खतांवर शासनाकडून दिले जाणारे अनुदान नेमके कोणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी की रासायनिक खत उत्पादक कंपन्यांसाठी?
Fertilizer Subsidy
Fertilizer SubsidyAgrowon

Agriculture Schemes : रासायनिक खतांवर शासनाकडून दिले जाणारे अनुदान नेमके कोणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी की रासायनिक खत उत्पादक कंपन्यांसाठी?

प्रत्येक वर्षी रासायनिक खतांची किंमत वाढत आहेत, तसे शासनाकडून या खतांवर देण्यात येणारी अनुदानाच्या तरतुदीत देखील वाढ होत आहे.

आपले शासन रासायनिक खतांवर अनुदान मोठ्या प्रमाणावर देत असल्याने ह्या किंमती वाढवण्यास कंपन्याकडून मागेपुढे पाहण्यात येत नाही.

किंमती का वाढल्या तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत हे कारण पुरेसे आहे. पण खरंच किंमती वाढल्या का हे तपासले जात नाही. कच्चा मालाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर खतांचे दरही कमी होतात का हे पाहणे गरजेचे आहे.

अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी १ लाख ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे.

पण प्रत्यक्षात मात्र २ लाख २५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. तर मागील हंगामातील खर्च २ लाख ५४ हजार कोटींचा झाला होता.

खतांवरील अनुदानाचे पैसे कंपन्यांना देण्याऐवजी शेतकऱ्यांना दिले आणि मूळ किंमतीला खरेदी करायला लावले. तर खत उत्पादक कंपन्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केला आहे का?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com