Shekhar Gaikwad : .. तर जमिनीचे खरे वारसदार कोण?

कृष्णाला आम्ही शेवटपर्यंत सांभाळले व त्यांची मयत होईपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेतली. तुम्ही दोघे भाऊ तर कुटुंबाला सोडून शहरात वेगळे राहत आहात. त्यामुळे मी स्वतः आणि माझी मुलगीच या जमिनीचे खरे वारस आहोत.
Land
Land Agrowon

शेखर गायकवाड

Rural Story : एका गावात श्रीकृष्ण नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी व दोन मुले होती. श्रीकृष्णाची पत्नी सारखी आजारी असायची. त्यानंतर श्रीकृष्णाची पत्नी खूप आजारी झाली व ती मयत झाली. काही दिवसांतच श्रीकृष्णाने शेजारील गावातल्या एका मुलीशी दुसरे लग्न केले.

श्रीकृष्णाच्या दुसऱ्या बायकोला एक मुलगी झाली. श्रीकृष्णाची पहिल्या बायकोची मुले मोठे झाल्यानंतर ती मुले शहरात राहायला गेली. काही वर्षांनंतर श्रीकृष्णाचे वृद्धापकाळाने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.

श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर पहिल्या बायकोची मुले व दुसऱ्या बायकोमध्ये वारसा हक्कावरून भांडणे सुरू झाली. पहिल्या बायकोच्या मुलांचे म्हणणे होते, की आम्ही दोघे भाऊच या जमिनीचे खरे वारस आहोत;

तर दुसऱ्या बायकोचे म्हणणे होते, की श्रीकृष्णाला आम्ही शेवटपर्यंत सांभाळले व त्यांची मयत होईपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेतली. तुम्ही दोघे भाऊ तर कुटुंबाला सोडून शहरात वेगळे राहत आहात. त्यामुळे मी स्वतः आणि माझी मुलगीच या जमिनीचे खरे वारस आहोत.

Land
Shekhar Gaikwad : मध्यस्थ, मयत अन् मुख्यत्यारपत्र

शेवटी श्रीकृष्णाच्या दुसऱ्या बायकोने तिची मुलगी व ती स्वतः खरे वारस आहेत, असा अर्ज वारस नोंदीसाठी तलाठी कार्यालयात दिला. श्रीकृष्णाच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी देखील वारस नोंदीसाठी स्वतंत्र अर्ज दिला.

तलाठी व सर्कल भाऊसाहेबांनी या प्रकरणाची स्थानिक चौकशी करून व तक्रार नोंद चालवून श्रीकृष्णाच्या पहिल्या बायकोची मुले आणि दुसऱ्या बायकोची मुलगी या सर्वांची नावे वारस म्हणून लावली.

सांगायचे तात्पर्य म्हणजे वारस नोंदी या वैयक्तिक कायद्यातील तरतुदीनुसार केल्या जातात. वारसांच्या वादात सामाजिकदृष्ट्या आपल्याला एखादी गोष्ट आवडते की नाही हा प्रश्‍न नसून कायद्यानुसार योग्य काय, हा खरा प्रश्‍न आहे. शिवाय महसूल अधिकाऱ्यांचे काम केवळ हक्कांची नोंदणी करणे हे आहे. सावत्र

मुलांमधील हिंदू वारस कायद्यानुसार चालणारे वाद हे केवळ दिवाणी न्यायालयातच सोडवले जाऊ शकतात.

ई-मेल shekharsatbara@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com