Karnataka Election २०२३ : कर्नाटकमध्ये कुणाचं पारडं ठरणार जड? भाजप, कॉँग्रेस, जेडीएसमध्ये चुरस 

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्याभरात १८ मोठ्या सभा घेऊन कर्नाटक पिंजून काढला आहे.
Karnataka Election
Karnataka Election Agrowon

Karnataka Election Update : देशाचे लक्ष असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवार (ता.८) शेवटचा दिवस आहे. १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप, कॉँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) कंबर कसून प्रचारात दणका उडवला आहे.

विरोधी पक्ष कॉँग्रेस आणि जेडीएसने भाजप समोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध कॉँग्रेस-जेडीएस अशी चुरशीचा सामना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतो आहे.

'ई बारिया निर्धारा, बहुमतादा बेजीपी सरकारा' (या वेळचा निर्धार, बहुमतचं भाजप सरकार) अशी घोषणा देत भाजपने राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांवर भर दिला आहे. तर कॉँग्रेस व जेडीएसने स्थानिक मुद्दे उचलून भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्याभरात १८ मोठ्या सभा घेऊन कर्नाटक पिंजून काढला आहे. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी ७ वेळा कर्नाटकला भेट देऊन विविध सरकारी योजनांची घोषणा केली. 

तर कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डी. के शिवकुमार यांनी सभा घेत भाजप सरकारवर टीका केली. भ्रष्टाचारसारखा स्थानिक मुद्दांचा आधार घेत प्रचार सभांमधून केंद्र आणि राज्य सरकारचा समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.  

जनता दलाने सरकारवर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, लहान उद्योग, भ्रष्टाचार मध्यवर्ती ठेवून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बोंमाई यांच्यावर हल्लाबोल केल्याचेही पाहायला मिळाले. 

Karnataka Election
Karnataka Assemble Election 2023 : कर्नाटकची प्रयोगशाळा!

जेडीएस प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे जेडीएसची भूमिका या निवडणुकीत निर्णायक राहील. जेडीएस 'किंगमेकर'च्या रूपात पुढे येऊ शकतं, असा होरा राजकीय विश्लेषकांचा आहे. जेडीएसचे प्रमुख कुमारस्वामी यांनी शेतकरी आणि गरिबांचे प्रश्न अधोरेखित करून प्रचार सभेत भाजपवर टीका केल्याची पाहायला मिळाले.

प्रचाराच्या रणधुमाळीत शेवटच्या काही दिवस एच. डी देवेगौडा यांनीही मैदानात उतरत भाजप आणि कॉँग्रेसवर प्रखर टीकेचे बाण सोडल्याचे दिसले. त्यामुळे जेडीएसचा पारंपारिक मतदार पुन्हा जेडीएसकडे खेचला जाण्याची शक्यता आहे, असं राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

कॉँग्रेस आणि जेडीएसने भाजपच्या बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला ही निवडणूक जड जाईल, असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे.

तर दुसरीकडे भाजप १५० जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी भाजपचे लक्ष जुन्या म्हैसूर भागावर आहे. या भागात भाजपचे वर्चस्व नसल्याने भाजपला २००८ आणि २०१८ मध्ये अनुक्रमे ११० आणि १०४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत १५० चं लक्ष गाठवण्यासाठी भाजप जुन्या म्हैसूरवर लक्ष ठेवून आहे. 

अमूल दुधाच्या कर्नाटक प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादावरून भाजपनं संयमी भूमिका घेतली होती. कारण या जुन्या म्हैसूर भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संख्या अधिक आहे. या दूध उत्पादकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून भाजपनं नंदिनी विरुद्ध अमूल वादात संयमी भूमिका घेतली होती.    

दरम्यान,  कर्नाटक निवडणुका जाहीर झाल्यापासून देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकमध्ये प्रचारासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप प्रचारासाठी कर्नाटक दौरा नुकताच केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com