Desi Govansh : देशी गोवंश फायदेशीर का आहेत?

सर्वाधिक पशुधन संख्या म्हणून भारत देश ओळखला जातो. भारतात देशी गोवंशाच्या प्रमुख तीस जाती आहेत. या जाती स्थानिक वातावरणात विकसित झाल्यामुळे व त्यांच्या काटक गुणांमुळे पिढ्यान पिढ्या निर्माण झालेली रोग प्रतिकार क्षमता व उत्पादन सातत्य टिकवून आहेत.
Desi Govansh
Desi Govansh Agrowon

सर्वाधिक पशुधन संख्या म्हणून भारत देश ओळखला जातो. भारतात देशी गोवंशाच्या (Indigenous Cattle) प्रमुख तीस जाती आहेत.

या जाती स्थानिक वातावरणात विकसित झाल्यामुळे व त्यांच्या काटक गुणांमुळे पिढ्यान पिढ्या निर्माण झालेली रोग प्रतिकार क्षमता व उत्पादन सातत्य टिकवून आहेत.

दुधाची सतत वाढत असणारी मागणी दर्जेदार दूध निर्मितीची (Milk Production) गरज आणि शेती क्षेत्र मालकी कमी कमी होत असल्यामुळे बैलावर आधारित शेतीचा विचार करण्याची गरज आहे.

त्यामुळे देशी गोवंशाविषय़ी माहिती असणे आवश्यक आहे.  देशातील गोवंशाचे वैशिष्टपूर्ण गुणामुळे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केलं आहे.

ओढकामासाठीच्या जाती

या जातीचे बैल शेती कामासाठी अतिशय उत्कृष्ट असतात. गायीपासून कमी दूध मिळते. यामध्ये खिल्लार, डांगी, लाल कंधारी, गवळाऊ, मालवी, हलीकर, अमृतमहल, सिरी, कांगायाम या जातींचा समावेश होतो. 

दुहेरी जाती 

या जातीचे बैल शेतीकामासाठी चांगले असतात. त्याचबरोबर गायीचे दूध उत्पादन सुद्धा चांगले असते. या जातीमध्ये हरियाणा, ओंगोल, कांकरेज, देवणी आणि राठी या जातींचा समावेश होतो. 

Desi Govansh
Desi Cow : शास्त्रीय पद्धतीने देशी गोसंवर्धन करण्याची गरज

दुधाळ जाती 

या जातीच्या गाई दुधासाठी अतीशय उत्तम असतात. यामध्ये गीर, सहिवाल, लाल सिंधी, थारपारकार या जातींचा समावेश होतो. 

देशी गोवंशाची वैशिष्ट्ये 

देशी वंशाच्या गाई ह्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावरही तग धरून राहतात. 

रोगप्रतिकारक्षमता अतिशय उत्तम असते. 

गाईपासून वेताची संख्या जास्त मिळते. 

देशी गाई वेगवेगळ्या हवामानात टिकून राहतात. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com