Andhra Pradesh Mahapadyatra: आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी महापदयात्रा का काढली?

अमरावतीला आंध्रप्रदेशची एकमेव राजधानी म्हणून विकसित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी अमरावती विभागातील शेतकऱ्यांनी आंध्र प्रदेश सरकारकडे केली.
Andhra Pradesh Farmers Padayatra
Andhra Pradesh Farmers PadayatraAgrowon

अमरावतीला आंध्रप्रदेशची एकमेव राजधानी म्हणून विकसित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी अमरावती विभागातील शेतकऱ्यांनी आंध्र प्रदेश सरकारकडे केली. यासाठी अमरावती विभागातील 29 गावांतील शेतकऱ्यांनी (Andra Pradesh Farmer) नुकतीच दुसरी महापदयात्रा (Andhra Pradesh Farmer Mahapadyatra) काढली. शेतकऱ्यांनी प्रथम वेंकटपलेम येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. यानंतर अमरावती परिक्षण समिती (एपीएस) आणि अमरावती शेतकरी संयुक्त कृती समिती (जेएसी) च्या नेत्यांनी आणि सदस्यांनी लाँग मार्च काढला. राज्यातील तीन राजधान्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पायी मोर्चाची हाक दिली.

नेमकं प्रकरण काय ?

तर या प्रकरणाची सुरुवात होते 2014 साली. 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या वेळी, आंध्रप्रदेश पुनर्रचना कायद्यात अशी तरतूद करण्यात आली होती की पुढील दहा वर्षांसाठी हैदराबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही देशांची संयुक्त राजधानी असेल. आंध्रप्रदेशच्या नवीन राजधानीसाठी जागा शोधण्यासाठी केंद्र सरकारने शिवराम कृष्णन समितीची स्थापना केली. समितीने आपल्या अहवालात आंध्रप्रदेशसाठी एकापेक्षा जास्त राजधानीचे मॉडेल स्वीकारण्याची शिफारस केली होती.

Andhra Pradesh Farmers Padayatra
Tur Import : आफ्रिकेतून तूर आयात का वाढतेय?

समितीने असा सल्ला दिला होता की विजयवाडा आणि गुंटूर दरम्यानचा प्रदेश राजधानी होण्यास योग्य नाही कारण तो अत्यंत सुपीक आहे. समितीने नव्या राजधानीसाठी काही जागाही सुचवल्या होत्या. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी समितीच्या शिफारशींकडे लक्ष न देता अमरावतीची नवी राजधानी म्हणून निवड केली. यासाठी त्यांनी अमरावती भागातील सुमारे 33,000 शेतकऱ्यांकडून 30,000 एकर जमीन जमिनी खरेदी केल्या होत्या. 22 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे नवीन राजधानीच्या बांधकामाची पायाभरणी केली.

2019 साली परिस्थिती बदलली...

2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या सत्ताधारी तेलगू देसम पार्टीचा सफाया करत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमध्ये सत्ता मिळवली आणि धडाकेबाज निर्णयांचा सपाटाच लावला. यात एक धाडसी निर्णय होता, तो म्हणजे रेड्डी यांनी अमरावतीसोबतच कुर्नुल आणि विशाखापट्टणम या आंध्रप्रदेशच्या नवीन राजधान्या असतील अशी घोषणा केली आणि संपूर्ण भारतीय राजकारणच ढवळून निघाले. कार्यकारी राजधानी विशाखापट्टणम, वैधानिक (लेजिस्लेटिव) राजधानी अमरावती तर न्यायालयीन राजधानी कुर्नूल अशी रेड्डींची योजना होती.

Andhra Pradesh Farmers Padayatra
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

आपल्या तीन राजधान्यांच्या समर्थनात बोलताना जगमोहन रेड्डी म्हणाले होते की, माजी मुख्यमंत्र्यांनी आंध्रप्रदेशच्या जनतेसमोर एका काल्पनिक राजधानीचे चित्र ठेवले होते जे कधीही उभारणे शक्य नाही. जगनमोहन रेड्डी यांनी राजधानीच्या त्रिभाजनाचा ठराव विधानसभेमध्ये बहुमताने मंजूर करून घेतला. पण आंध्रप्रदेशच्या विधानपरिषदेने हा ठराव नामंजूर केला. विधासभेमध्ये जरी जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसचे 175 पैकी 151 आमदार होते. तर विधानपरिषदेमध्ये चंद्रबाबूंच्या तेलगू देसम पार्टीचे 58 सदस्य होते आणि वायएसआर काँग्रेसचे मात्र 11 सदस्य होते.

रेड्डी सरकारने पहिल्या दिवसापासून अमरावतीची सर्व विकासकामे बंद केली होती. अमरावतीकरांच्या हातून नवी राजधानी निसटणार, याचेच हे संकेत होते. अमरावतीच्या विकासासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, ते सरकारच्या राजधानीच्या निर्णयाविरोधात निदर्शने करू लागले. दरम्यानच्या काळात राजधानीच्या त्रिभाजनाच्या विरोधात अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. शेतकऱ्यांनी रेड्डींच्या या योजनेला विरोध केला होता कारण त्यांनी आपल्या जमिनी राजधानीसाठी दिल्या होत्या. त्यांच्याकडे उपजीविकेची शाश्वत साधने उरलेली नव्हती. त्यामुळेच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरला अमरावती ते तिरुपती अशी 45 दिवसांची पायी पदयात्रा काढली होती.

त्यानंतर नुकतीच पुन्हा एकदा अमरावतीच्या 29 गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांनी महापद यात्रा काढली. जोपर्यंत राज्य सरकार तिन्ही राजधान्यांचे पाऊल मागे घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त यावेळी केला. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष (वायएसआरसीपी) वगळता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com