World Donkey Day: गाढव दिन का केला जातो साजरा ?

World Donkey Day : बांधकामाच्या ठिकाणी, रेती घाट, वीटभट्टी तसेच काही भागात धान्य वाहतुकीसाठी गाढवांचा प्रामुख्याने उपयोग होतो. ह्यात अनेक प्रकार तसेच गाढवाची उपयोगानुसार विविधता आढळते.
World Donkey Day
World Donkey DayAgrowon

आज World Donkey day आहे. महाराष्ट्रातील बहुतांश धोबी, वडार, कुंभार कैकाडी हे गाढव पाळणारे लोक आहेत ह्यांचा उदरनिर्वाह गाढ्वांवर अवलंबून आहे.

ज्या भागात अजूनही यंत्र, वाहने पोहोचत नाही तिथे अजूनही गाढव हाच प्राणी उपयोगात येतो. मुख्य व्यवसाय गाढवपालन आणी गाढवांचा वापर करुन रोजगार करणे.

बांधकामाच्या ठिकाणी, रेती घाट, वीटभट्टी तसेच काही भागात धान्य वाहतुकीसाठी गाढवांचा प्रामुख्याने उपयोग होतो. ह्यात अनेक प्रकार तसेच गाढवाची उपयोगानुसार विविधता आढळते.

महाराष्ट्रात प्रमुख्याने  महत्त्वाच्या गाढवांसाठी प्रासिद्ध असलेल्या यात्रा आहेत- माळेगाव (नांदेड), जेजुरी (पुणे), मढी (अह्मद्नगर) आणि देऊळगावराजा (बुलढाणा). मुख्यत: राजस्थान आणि गुजरात मधून व्यापारी या यात्रेंमधे गाढव विकायला येतात.

चांगल्या ग़ाढवाची किमंत अंदाजे 20 हजार रुपये असते. व्यापारांशी असलेले संबंध गाढवाची गुणवत्ता यावरुन व्यवहार होतात. ह्यापैकी बहुतेक लोक हे मादी विकत घेत नाहीत कारण ओढकाम.

कच्छ गुजरात राज्यातून राठोड आणि गढिया हे लोक गाढव विकण्यासाठी येथे येतात. माळेगाव यात्रेत तर तेलंगण, क़र्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र येथील लोक गाढव विकत घेण्यासाठी येतात.

माळेगावच्या यात्रेच्यावेळी एका गाढव विकत घेणार्या एकाशी बोललो त्याने सांगितलेली माहिती आणि अनुभव हे ह्या विश्वाबद्द्ल अचंबित करणारे होते,’’ आजोबांपासुन, पुर्वीपासुन आम्ही गाढवे पाळतो, मुख्यतः शहरात व शहराच्या आजुबाजुला २० किलोमिटरपर्यंत गाढवांचा वापर- सामान वाहतुक, रेती वाहतुक याकरता आम्ही करतो. शहरी भागात- वाळु-रेती-गिट्टी-विटा वाहतुक याकरता गाढवे वापरली जातात.

आणी नदिवर गेलो तर नदितुन रेती काढुन ती ट्रकमधे भरुन दिली जाते. सध्या माझ्याकडे ३ गाढवे आहेत. माळेगाव, राजा-देउळगाव, येथील जत्रेतुन आम्ही गाढवे घेतो. कुंभार लोक मुख्यतः गाढवाच्या माद्या पाळतात, कारण माठ, मटके यांना जास्त वजन नसते, ते सामान मादी वाहुन नेते, व मादिला झालेली पिल्ले विकुन त्यांना त्यातुन पैसेही मिळतात.

दर माळेगावच्या जत्रेला आम्ही जातोच. गाढव हे बिन खर्चाच जनावर फक्त विकत घेतलं की मरेपर्यंत काही खर्च नाही. गाढवीणीच दुध बरेच लोक दम्यावर इलाज म्हणून जास्त किंमत देउन नेतात त्यातून देखिल आम्ही पैसे कमावतो. व्यवसायानुसार गाढवाच्या वापरात बदल असतो. 

परीट, कुंभार- या जमाती गाढवाचा वापर चांगल्या प्रकारे करतात, गाढवाला व्यवस्थित खायला देतात, त्यांची निगा राखतात. त्यांना काही आजार झाला तर औषध उपचार करतात. दर आठवड्याला गाढवे धुतात.

भोईर – हे मुख्यतः मालवाहतुक करतात,  हे फक्त गाढवांना संध्याकाळचे खायला देतात, गरज पडल्यास औषध पाणी करतात

कैकाडी- (मुख्यतः जे वाळुउपसा करतात व जास्त पैसे कमवतात) यांचा गाढवांप्रती दृष्टीकोन हा हे फक्त मेहनत करण्याकरता पाळलेले जनावर आहे हे गाढवांची अजिबात निगा ठेवत नाहित. गाढवाची किंमत यांची ३-४ महिन्यात वसुल होते. व यामुळेच कदाचित हा द्रुष्टीकोन आलेला असु शकतो, यांच्याकडे ४-५ वर्षापेक्षा जास्त गाढव टिकत पण नाही.  

World Donkey Day
Cow Hug Day : ‘गाय अलिंगन दिवस’ टीकेनंतर अखेर मागे

2012 च्या पशुगणनेनुसार महाराष्टात 32070 इतकी गाढवांची संख्या होती येणार्या पशुगणनेत ह्या संख्येवर परिणाम झालेला दिसू शकतो कारण गाढवांच्या बाबतीत, गाढव पाळणार्या लोकसमूहांबाबतीत कुठलेही धोरण, कुठल्याही योजना आखलेल्या दिसत नाहीत.

गाढवांच्या जाती कुठल्या?, त्याना होणारे रोग कुठले? त्यासाठी लस? वाहतूक किंवा गाढवांच्या शक्तिनुसार ऊर्जा तयार करणे. गाढवांचा विमा, इत्यादी प्रश्न या लोकांना या व्यवसायापासून दूर लोटत आहेत कारण याचे कुठेही मोजमाप नाही, उल्लेख नाही आकडेवारी नाही.

परंतु हे सर्व निसर्गावर आधारीत मेह्नतीचे जीवन जगताना दिसतात. कमीतकमी संसाधनावर कसे जगता येत ह्याच उदाहरण देतात.

ब्रुक, डॉंकी सॅंक्चुरी या जाग़तिक संस्था तसेच संस्कृती संवर्धन मंडळ, सहजीवन यासारख्या संस्था या बाबत मूलभूत काम करित आहेत.

महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठ येथील डॉ. बनकर महाराष्ट्रातील गाढवांच्या जातींवर अभ्यास करीत आहेत. भारतात फक्त स्पिथी हीच गाढवाची जात म्हणून नोंदली गेली आहे बाकी प्रदेशातील गाढवांवर अभ्यास होणे गरजेचे आहे.

नॅशनल लाईवस्टोक मिशन, नाबार्ड, महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ यांच्या योजनांमधे गाढव व गाढव पाळणारे लोक यांचा समावेश होणे गरजेचे आहे. लोकांचे रोजगार तसेच खेड्यातून शहरांकडे होणारे पलायन या महत्त्वाच्या प्रश्नावर अश्या छोट्या पण महत्त्वाच्या घटकांचा विचार होणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com