Soya protein : सोयाबीनला का म्हणतात वंडरबीन?

सोयाबीन हे तेलबिया पीक असले तरी त्यात प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं.
Soybean
SoybeanAgrowon

सोयाबीन (Soybean) हे तेलबिया पीक (Oilseed Crop) असले तरी त्यात प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी सोया प्रोटीन हा चांगला स्रोत ठरू शकतो. भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.  

'पीएफएनडीएआय'ने  'राईट टू प्रोटीन' च्या सहकार्याने 'सोया: अ सुपरफूड अँड वंडर बीन' हा अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात सोया प्रोटीनच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

Soybean
Soybean : शेतकरी म्हणतात, सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी हवे नवीन तंत्रज्ञान, नवे वाण

प्रथिने माणसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून वयाच्या प्रत्येक टप्प्यात त्यांची आवश्यकता भासते. सोयाबीन हा प्रथिनांचा मोठा स्त्रोत असून पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रथिनांची वाढ करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. भारतीयांमधील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक सोया-आधारित खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. 

Soybean
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?| ॲग्रोवन

'पीएफएनडीएआय'चे कार्यकारी संचालक जगदीश पै म्हणाले की, "भारतीयांच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असणं ही चिंतेची बाब आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांचा विकास खुंटतो. सोया प्रथिनांमुळे ही कमतरता भरून काढता येऊ शकते. नावीन्यपूर्ण अन्नपदार्थ, तसेच प्रथिनांचे महत्त्व आणि विशेषत: सोया प्रथिनांचे फायदे याविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे."

भारतातील प्रथिनांच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी प्रथिनांचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सोयाबीनसारख्या उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांमधून योग्य प्रमाणात अमीनो आम्ल मिळतात. त्यामुळे शरीरातील उतींची निरोगी वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com