Barnyard Millet : फक्त उपवासापुरतेच भगरीचे महत्व नाही

भागरीमध्ये प्रथिनांच प्रमाण भरपूर असते आणि कॅलरी कमी असतात.जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे भगर खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही.
Barnyard Millet
Barnyard MilletAgrowon

कुठलाही उपवास म्हटल की, दोन गोष्टी हमखास आठवतात. साबुदाणा खिचडी (Sago) किंवा वरई (Barnyard Millet) चा भात किंवा भगर.

भगर हे अतिशय उपयुक्त तृणधान्य (Millets) असून  प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, गुजरात आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात पिकवले जाते. भगर हे सर्वात वेगाने वाढणारे पीक असून केवळ ४५ दिवसात तयार होते आणि कोणत्याही परिस्थितीत पिकवले जाऊ शकते.

भागरीमध्ये प्रथिनांच प्रमाण भरपूर असते आणि कॅलरी कमी असतात.जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे भगर खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे जास्त प्रमाणात अन्न सेवन केले जात नाही.

कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त आहे.  

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि पोषण विभागाने केलेल्या संशेधनानूसार भगर या धान्यापासून सहजपणे पुरी, शंकरपाळे, शेव, कचोरी, शेवई आणि खाकरा सारखे विविध अन्नपदार्थ बनवता येतात. 

भगर खाण्याचे आरोग्यदायी फायदे  

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी तंतुमय पदार्थांची गरज असते. म्हणूनच आहारात तंतुमय पदार्थांच प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.

भगर पचायला हलकी असते. भगर खाल्ल्याने बद्धकोष्टतेचा त्रास असेल तर तो दूर होतो. 

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळेसाठी टिकून राहते.

या कारणामुळे वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे. 

Barnyard Millet
Animal Record Keeping : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे महत्व काय?

भगर हे लो ग्लायसेमीक इंडेक्स अन्न प्रकारात मोडते. कमी  ग्लायसेमीक इंडेक्स असणारे अन्न रक्तातील अतिरिक्त  साखरेचे प्रमाण रोखण्यास मदत करते.

म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून मधुमेही रुग्णांसाठी भगर फायदेशिर आहे.

ग्लुटेनयुक्त अन्न खाल्ल्याने काही लोकांना पोटात दुखणे, अपचन होणे यासारखे त्रास होतात अशा लोकांसाठी भगर हे पूर्णपणे ग्लुटेन फ्री अन्न आहे.

भगरीत लोह जास्त प्रमाणात असते. साधारणत १०० ग्रॅम भगरीतून १८.५ मिलीग्राम लोह मिळते. याशिवाय जीवनसत्व अ, क, ई आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 

हाडांची वाढ व आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम उपयोगी आहे. भगरीमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्धांना भगर जेवणातून देणे फायद्याचे ठरते.

मोठी माणसे भगर जरी उपवासाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो. कारण तो पचायला अतिशय हलका असतो. 

भगरी सारखे पौष्टिक अन्न  उपवासाला न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.

त्यासाठी भगर केवळ उपवासादिवशीच न खाता भगरीचा आहारात जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे. अशी ही भगर सर्वांना अतिशय उपयोगी असून आरोग्य टिकवण्यासाठी सक्षम आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com