Resistant Crop Research : प्रतिकारक्षम पीकवाणांवर संशोधन करणे का आहे गरजेचं?

वातावरणातील बदल व बदलणारा मॉन्सून याचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांना. मशागतीचे वाढलेले दर, महाग झालेल्या कृषी निविष्ठा यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे.
Summer Crop
Summer CropAgrowon

शिवाजी काकडे

Indian Agriculture : ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाने राज्यात रब्बी व उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, फळपिके यांना मोठा फटका बसत आहे. रब्बी पिके तर हवामान बदलास अतिसंवेदनशील असतात.

वातावरणातील बदल व बदलणारा मॉन्सून याचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांना. मशागतीचे वाढलेले दर, महाग झालेल्या कृषी निविष्ठा यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यात हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले की शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद होते.

बऱ्याचदा जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. मिळाली तरी ती फारच तुटपुंजी असते. यातून शेतकरी पूर्णपणे सावरू शकत नाही. वाढलेला शेती खर्च व शेतीमालाचे पडणारे दर यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्‍यांना संकटात घेऊन जात आहे.

यामुळेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर खराब होते या धक्क्याने अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यावर तात्पुरती मलमपट्टी करणारे उपाय चालणार नाहीत तर त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

Summer Crop
BT Cotton : बीटी कापूस वाण संशोधनाबाबत ‘पंदेकृवि-महाबीज’मध्ये करार

पर्यावरणातील बदल, तापमान वाढ, अवकाळी पाऊस याचा पहिला फटका बसतो तो शेतकऱ्यांना. परंतु या प्रश्‍नाकडे केवळ शेतकऱ्यांची समस्या म्हणून पाहता येणार नाही. असे केल्यास एके दिवशी संपूर्ण जगाला अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो. संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.

वाढत्या पिकांच्या नुकसानीने अन्नधान्य उत्पादनात मोठी घट झाल्यास खूप भाववाढ होऊन अनेकांचा भूकबळीही जाऊ शकतो. हरितक्रांतीपूर्वी भारतासह अनेक देशांना अन्नटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. अमेरिकेकडून मिलो गहू आयात करताना भारताला बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या होत्या.

हरितक्रांती झाली व संकरित वाण विकसित झाले. ते अधिक उत्पादन देऊ लागले. अन्नधान्य आयात करणारा भारत देश आज मोठ्या प्रमाणात अन्नधान्य निर्यात करत आहे. भारत हा प्रमुख निर्यातदार देश बनला आहे.

आता परत एकदा हरितक्रांती२ ची गरज आहे. अधिक उत्पादन देणारे वाण व वातावरणातील बदलात टिकून राहणारे वाण संशोधित करण्याची गरज आहे. मागील हंगामात द्राक्ष काढणीस येण्याच्या काळात तापमान वाढ झाली, त्यामुळे द्राक्षमणी गळाले. अधिक तापमानातही तग धरणारे तसेच पोषणमूल्य अधिक असलेले वाण विकसित करावे लागतील.

Summer Crop
Onion Verity : ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’लाल कांद्याचा वाण विकसित

कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसतो. दीर्घकाळ टिकणारा, पाण्यातही तग धरणारे वाण विकसित झाले तरच शेती वाचवणे शक्य आहे. अवकाळी पावसात पीक पडण्याचे प्रमाण मोठे आहे. नुकसानीचे कारणच पीक आडवे होणे आहे. वाऱ्यातही तग धरणारे वाण विकसित होणे गरजेचे आहे .

अन्नधान्य पिके, भाजीपाला, फळपिके वारा, पाणी याला संवेदनशील असतात. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था यांनी अशी वाणे संशोधित करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाकडून यासाठी संशोधन संस्थांना विशेष आर्थिक पाठबळ मिळायला हवे.

पाण्यात, वादळी वाऱ्यात, वाढणाऱ्या तापमानात तग धरणारे वाण विकसित झाले तर आणि तरच शेती, शेतकरी वाचू शकेल. अन्यथा, जगाला पोशिंदा मृत्यूला असाच कवटाळीत आत्महत्या करत राहील.

लेखक - शिवाजी काकडे, पाथ्री, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com