Sharad Pawar : कांद्यासह शेतीप्रश्नावर लोकसभेत आवाज उठविणार : शरद पवार

देशात आणि राज्यात सरकारी धोरणामुळे शेती अडचणीत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Nagar News : देशात आणि राज्यात सरकारी धोरणामुळे शेती अडचणीत आहे. कांदा (Onion) हे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे पीक आहे. एक किलो कांदा पिकवायला दहा रुपये खर्च येतो. मात्र विक्रीच्या वेळी किलोला दर दोन-तीन रुपये मिळत आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला कांद्याच्या दराबाबत भूमिका घ्यायला लावणे गरजेचे आहे. कांदा, उसासह अन्य पिके, शेतीप्रश्नाबाबत लोकसभेच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सहकारी आवाज उठवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Onion Rate: राज्यात नाफेड कांदा खरेदी करतच नाही; पवारांची राज्य सरकारवर घणाघाती टीका

निघोज (ता. पारनेर) येथे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त व पंतसस्थेच्या नामकरण सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्‍यासह आमदार नीलेश लंके, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार दादा कळमकर, सुमन शेळके, पोपटराव गावडे, राहुल जगताप, राजेंद्र फाळके, घनश्‍याम शेलार, प्रतापराव ढाकणे, हिंद केसरी संतोष वेताळ, महाराष्‍ट्र केसरी चंद्रहार पाटील उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, ‘‘मी मतदार संघात फिरत असताना गरीब घरातील मुलांना महिन्यात किमान दहा सायकली देतो, मागणी वाढत गेली.

आता आठ हजार सायकलींची मागणी केली. आता सात हजार लेकरांची स्वप्ने पूर्ण करत आहे. आता लवकरच शरद पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे स्‍वप्‍न आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com