Namo Mahasanman: नमो महासन्मान योजनेतील सहा हजार रूपयांत आणखी वाढ होणार का? उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मधाचे बोट 

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली.
Devendra Fadnvis
Devendra FadnvisAgrowon

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये देण्याच्या घोषणेचे विधानसभेत जोरदार समर्थन केले.

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर बी-बियाणे घेण्यासाठीही पैसे नसतात. त्यावेळी हे पैसे उपयोगी पडतील, असे फडणवीस म्हणाले. 

तसेच ही केवळ सुरूवात असून पुढच्या काळात या निधीत वाढही केली जाऊ शकते, असे संकेत फडणवीस यांनी दिले.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली.

त्यानुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी सहा हजार रूपये जमा करण्यात येतील. त्यासाठी ६९०० कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून सध्या वार्षिक सहा हजार रूपये शेतकऱ्यांना दिले जातात. त्यात आता राज्याच्या योजनेची भर पडणार आहे. 

``शेतकऱ्यांना आता केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे १२ हजार रूपये मिळतील. ही सुरूवात आहे. सुरूवात महत्त्वाची असते. पुढील काळात या १२ हजारात आणखी वाढ होऊ शकते, `` असे फडवणीस म्हणाले. 

Devendra Fadnvis
Devendra Fadanvis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये ही अत्यंत तुटपुंजी रक्कम आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती.

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ``केंद्र सरकारने शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका करताना हीच चूक केली होती.

तेव्हाही महिन्याला आणि दिवसाला किती कमी पैसे मिळणार याचे गणित मांडले होते.

परंतु नंतर निवडणुकीत संपूर्ण सफाया झाल्यावर हेच नेते म्हणायला लागले की सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रूपये दिल्याचा हा परिणाम आहे. ``

आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर एका वेळी दहा हजार रूपये खर्च करतो. परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान होते.

तेव्हा त्याला पुन्हा पेरणीसाठी बियाणे घ्यायलाही पैसे नसतात.

अशा अडचणीच्या काळात हे सहा हजार रूपये उपयोगी पडतील, अशा शब्दांत फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे समर्थन केले   

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना आपण शेतकऱ्यांसाठी अशी योजना सुरू करण्याची सूचना केली होती, परंतु ती स्वीकारण्यात आली नाही, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी करून दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com